नवी दिल्लीः करोना व्हायरसला ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) मोबाइल अॅप संबंधी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपचा वापर करणे बंधनकारक होणार आहे. कोविड-१९ ला रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. सर्व कंपन्यांना या आदेशाचे १०० टक्के पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

वाचाः

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-१९ कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या लोकांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपचा वापर करणे गरजेचे आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, सरकारी आणि खासगी सेक्टरमधील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. सर्व संस्थेच्या प्रमुखांकडे ही जबाबदारी सोपवली आहे. कंपनीमधील सर्व कर्मचारी याचे १०० टक्के पालन करतात की नाही, याची जबाबदारी कंपनीच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी सरकारने देशभरात लॉकडाऊन ३ मे वरून १७ मे पर्यंत वाढवला आहे. काही ठिकाणी यात सूट देण्यात आली आहे.

वाचाः

मोबाइल अॅप आरोग्य सेतू कोविड-१९ चा धोका दिसल्यास अलर्ट करण्यास मदत करतो. तसेच लोकांना याची पुरेसी माहिती, करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आणि याच्या लक्षणासंबंधीची माहिती या अॅपवरून दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल मध्ये मन की बात या कार्यक्रमात डाऊनलोड करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. हे अॅप स्मार्टफोनच्या ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाला ट्रेस करण्यास मदत करतो. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ८ कोटी वेळा अॅप डाऊनलोड करण्यात आला आहे.

वाचाः

आरोग्य सेतूचा असा वापर करा

>> आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी फोन नंबरची नोंदणी करा. फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल. ते एन्टर केल्यानंतर अॅपची नोंदणी होईल.

>> त्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचे अॅक्सिस मागेल.

>> अॅप उघडल्यानंतर पर्सनल माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय आणि ३० दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्कीप करू शकतात.

>> त्यानंतर भाषा निवडू शकतात. संकटाच्या या काळात स्वतः कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतात.

>> आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. ज्यात हाय रिस्कची एक गट माहिती पडतो. सोशल ग्राफ लोकेशनची माहिती या आधारावर बनवली जावू शकते. ज्यावेळी तुम्ही हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here