Buying 5G Smartphones: जर तुम्ही फोन आणि विशेषत: 5G फोन खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर कदाचित ही योग्य वेळ नाही. पण, जर तुम्ही महिनाभरानंतर 5G फोन घेतला तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. भारतात गेल्या २-३ वर्षांपासून 5G फोन विकले जात आहेत. पण, ते 5G Smartphones नावाने फक्त 5G आहेत . पण त्यात फक्त सिम मात्र 4G आहेत. इतकेच काय, काही लोकांकडे 5G फोन असूनही, ते खात्रीने सांगू शकत नाहीत की 5G सेवा भारतात आल्यावर त्यांचा फोन काम करेल ? पण, जर तुम्ही महिनाभरानंतर 5G फोन विकत घेतला तर तुमच्यासाठी खूप काही बदलेल आणि अनेक गोष्टी स्पष्ट होतील. जाणून घ्या अशीच ५ कारणे ज्यामुळे महिनाभरानंतर 5G फोन खरेदी केला तर अनेक फायदे होतील.

4G Vs 5G

4g-vs-5g

4G प्रमाणे 5G येणार नाही: सध्या, भारत सरकारकडून आलेल्या माहितीनुसार, देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. म्हणजेच ही सेवा अगदी छोट्या स्तरावर सुरू होणार आहे. त्यामुळे थोडं थांबा, २६ जुलैपासून सुरू होणारा 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण होताच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. 5G कोणत्या शहरात येणार आहे, कोणत्या बँडवर लाँच होणार आहे, 5G चे कोणते तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. भारतात, किंमत काय असेल आणि या वर्षी तुमच्या शहरात सेवा येईल की नाही? या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही 5G फोन घेण्यासाठी महिनाभर वाट पाहू शकता.

वाचा: ४ हजार रुपये स्वस्त मिळतोय Moto चा ५G फोन, ५०MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसारखे भन्नाट फीचर्स

5G Sim

5g-sim

5G सिमच्या किंमती आणि अपग्रेडबद्दल बातम्या असतील : स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सिम कार्ड. ज्याशिवाय फोन अगदीच निकामी ठरतो. 5G सेवा आल्यानंतर, तुम्हाला तुमचे सिम देखील अपग्रेड करावे लागेल. कारण, हे 4G सिम 5G साठी काम करणार नाहीत. 5G सेवेच्या घोषणेसह, नवीन सिम आणि सिम अपग्रेडसाठी ऑफरची माहिती देखील उपलब्ध होईल. जी सध्या स्पष्ट नाही. म्हणूनच या क्षणी फोन घेण्यापेक्षा काही काळानंतर 5G फोन घेणे चांगले आहे. ज्याचे Main Feature तुम्ही किमान वापरू शकता.

वाचा : Recharge Plans : अनलिमिटेड कॉलिंग-५६ GB डेटासह फ्री Disney+ Hotstar, पाहा ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लान्स

5G Price

5g-price

5G ची किंमत अंदाजे असेल : १५ ऑगस्टपासून भारतात 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यादरम्यान कंपन्या त्यांच्या 5G किंमत आणि 5G रिचार्ज प्लान्सची घोषणा देखील करू शकतात. किंमतीबद्दल, एकच बातमी आहे की, भारतात 5G जगातील सर्वात स्वस्त असेल. परंतु, 4G सह ते किती असेल किंवा किती महाग असेल हे या अद्याप माहित नाही. अशात, आतापासून तुम्ही 5G फोन घेतला आणि सेवा खूप महाग झाली.तर, फोनचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर, किंमतीबद्दल बरेच काही कळेल आणि मग तुम्हाला योग्य 5G फोन निवडणे सोपे होईल.

वाचा : Smartphone Tips: ‘या’चुकांमुळे कमी होते स्मार्टफोनचे लाईफ, सोपी ट्रिक्स फॉलो केल्यास फोन चालेल वर्षानुवर्षे

5G Smartphones

5g-smartphones

ऑगस्टमध्ये बरेच नवीन फोन लाँच होत आहेत: ऑगस्टपासून भारतात फेस्टिव्ह सिझन सुरू होतो आणि या काळात सर्व कंपन्या त्यांचे नवीन फोन आणि ऑफर्स घेऊन येतात. फोनचे लॉंचिंग वर्षभर होत असले तरी जुलै आणि ऑगस्टच्या अखेरीस अनेक फोन लाँच होणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही महिनाभर वाट पाहिल्यास नेटवर्क बँड स्पष्ट होईल आणि तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फोनही मिळू शकेल. म्हणून सध्या स्मार्टफोन खरेदीची घाई करू नका. जुलै आणि ऑगस्टच्या अखेरीस Oppo Reno 8 मालिका, Iqoo 9T, Xiaomi 12s, Redmi K5oi, Vivo V25 सह अनेक फोन लाँच होणार आहेत.

वाचा : Recharge Plans: रोज १ GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करणाऱ्या ‘या’ प्लान्सची लिस्ट एकदा पाहाच, सुरुवातीची किंमत ४९ रुपये

5G Band

5g-band

5G बँड स्पष्ट होईल: ज्या लोकांना काही वर्षांपूर्वी 5G फोन मिळाला आहे. ते भारतात 5G सेवा आल्यावर 5G वापरण्यास सक्षम असतील की, नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण, भारतात 5G सेवा कोणत्या बँडवर सुरू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २६ जुलैनंतर ५जी चा लिलाव संपेल आणि कोणाला किती आणि कोणता स्पेक्ट्रम बँड मिळाला हे कळेल. सोबतच चित्र स्पष्ट होईल की, भारतात 5G साठी कोणते तंत्रज्ञान काम करणार आहे आणि कोणता ऑपरेटर कोणत्या बँडवर सेवा देईल. त्यामुळे 5G स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर त्यासाठी घाई न करता थोडी प्रतीक्षा करणे चांगले ठरेल.

वाचा : Smartphone Sale: १०८ MP कॅमेरासह येणाऱ्या ‘या’ दमदार स्मार्टफोनचा पहिला सेल आज, खरेदीवर मिळणार ऑफ

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here