नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. विवोने स्मार्टफोन च्या किंमतीत कपात केली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता हा फोन स्वस्तात मिळणार आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः

ची नवीन किंमत

विवो एस१ चा ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत कंपनीने १ हजार रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर या फोनची किंमत आता १६ हजार ९९० रुपये झाली आहे. या आधी या फोनची किंमत १७ हजार ९९० रुपये होती. याशिवाय ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोन सुद्धा उपलब्ध आहे. या फोनची किंमत १९ हजार ९९० रुपये आहे. ग्राहक या स्मार्टफोनला प्री बुक करू शकतात.

वाचाः

Vivo S1 चे फीचर्स

Vivo S1 या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रियरमध्ये AI ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या ट्रिपल सेटमध्ये १६ मेगापिक्सल प्लस ८ मेगापिक्सल प्लस २ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. विवो एस१ या स्मार्टफोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा डिस्प्ले खूप रिच आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मजा येते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

वाचाः

या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक Helio P65 प्रोसेसर दिला आहे. ४००० mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग साठी १८ W ड्यूअल इंजिन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. हा फोन दुसऱ्या चार्जरनेही चार्ज करता येवू शकतो. नवीन एस१ स्मार्टफोनमध्ये Funtouch OS 9 सोबत अँड्रॉयड ९ पाय वर काम करतो. किंमत कमी असल्याने हा फोन खरेदी करण्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here