नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी पोको (Poco) आपला लेटेस्ट स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर नुकताच जारी केला आहे. ज्यात पोको वेकिंग अप दिसत आहे. कंपनीने आतापर्यंत पोको एफ २ ची लाँचिंगची तारीख जाहीर केली नाही. परंतु, या कंपनीच्या फोनचे खास वैशिष्ट्ये लिक झाली आहेत. यात किंमत आणि त्याची खास वैशिष्ट्यांची माहिती समोर आली आहे.

वाचाः

ट्विटरवर जारी झाला टीझर

कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्टर जारी केला आहे. या पोस्टरवर पोको वेकिंग अप दिसत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, कंपनी लवकरच पोको एफ २ स्मार्टफोनला बाजारात लाँच करणार आहे.

Poco F2 ची संभावित वैशिष्ट्ये
कंपनीने या फोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि ५ जी कनेक्टिविटीचा सपोर्ट देणार आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि ८ जीबी रॅमचा सपोर्ट देण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. या फोनमध्ये किती बॅटरी असू शकते, यासंबंधीची माहिती अद्याप मिळाली नाही.

वाचाः

Poco F2 ची संभावित किंमत
मीडिया रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची किंमत मिड प्रीमियम रेंजमध्ये ठेवण्यात येईल. या स्मार्टफोनची किंमत आणि त्याची खास वैशिष्ट्ये स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर उघड होईल.

वाचाः

Poco F1 २०१८ मध्ये लाँच झाला होता
पोकोने शाओमीसोबत मिळून पोको एफ१ स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. Poco F2 या फोनमध्ये ६.१८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात येणार आहे. याचे आस्पेक्ट रेशियो 18.7:9 आहे. तसेच या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉयड ओरियो ८.१, स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी एड्रेनो ६३० जीपीयू, ६ आणि ८ जीबी रॅम आणि ६४ आणि १२८ जीबी स्टोरेजचा फोन मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये लिक्विड कूल कुलिंग सिस्टम आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्याची शक्यता आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here