Discounts On Branded Smartphones: स्मार्टफोन खरेदी करतांना त्यावर जर डिस्काउंट मिळत असेल त्याहून चांगले काय असणार. भारतातील स्मार्टफोन युजर्स काहीही खरेदी करायचे असल्यास त्यावर किती ऑफ आहे, काही डिस्काउंट आहे का याची आवर्जून चौकशी करतात. तसेच, सेलची प्रतीक्षा देखील करतात. Amazon Prime Day Sale अशाच एक जबरदस्त सेलपैकी एक. ज्याची स्मार्टफोन युजर्स वाट पाहत असतात. तुम्हीही या युजर्सपैकी एक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Amazon Prime Day Sale २०२२ सेल २३ जुलै आणि २४ जुलै 2022 रोजी भारतात आयोजित करण्यात येत आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या उत्पादनांवर जबरदस्त सूट दिली जाणार आहे. सेलच्या सर्व ऑफर्सची माहिती आधीच देता येणार नाही. परंतु, Amazon च्या या सेलमध्ये प्रत्येक ब्रँडच्या फोनवर डिस्काउंट मात्र नक्कीच मिळणार आहे.

Samsung Galaxy M52

samsung-galaxy-m52

Samsung Galaxy M52: सॅमसंगचे अनेक स्मार्टफोन सीरिजचे फोन स्वस्तात खरेदी करता येतील. Amazon Prime Day Sale 2022 मध्ये , तुम्ही १५ हजारांच्या बंपर सवलतीवर Samsung Galaxy M52 5G खरेदी करू शकता. Samsung Galaxy M52 ची किंमत २०,९९९ रुपये आहे.Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमघ्ये ६.७ इंच सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले दिला असून, हा फुल एचडी+ रिझॉल्यूशन आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. यात फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

वाचा: Smartwatches In India: स्मार्ट लाईफ स्टाईलसाठी खरेदी करा ‘या’ टॉप स्मार्टवॉचेस, तुमच्या फिटनेसचीही घेतील काळजी, पाहा लिस्ट

One Plus 9

one-plus-9

One Plus 9: तुम्हाला या संपूर्ण अँड्रॉइड स्मार्टफोन सीरिजवर १५ हजार रुपयांपर्यंतची मोठी सूट दिली जाईल. One Plus 9 Device Amazon वर ३७,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. या डीलमध्ये अनेक बँक ऑफर्स आणि अतिरिक्त सवलती देखील दिल्या जात आहेत. OnePlus 9 मध्ये, कंपनीने Hasselblad ब्रँडेड कॅमेरा सिस्टम देण्यात आली असून OnePlus 9 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC आहे. फोनमध्ये १२ GB रॅम आणि २५६GB इंटरनल स्टोरेज सोबत जोडले आहे.

वाचा: Recover Deleted Photos: आवडते फोटोज नकळत डिलीट झाले ? ‘या’ टिप्सच्या मदतीने सहज करा रिकव्हर, पाहा स्टेप्स

iQoo Z6

iqoo-z6

Apple, Samsung आणि OnePlus सारख्या ब्रँडसह, iQOO इत्यादी देखील त्यांचे फोन स्वस्तात विकत आहेत. iQOO Z6 १४,९९९ रुपये किमतीत लाँच करण्यात आला होता. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या मदतीने तुम्ही हा स्मार्टफोन आणि इतर iQOO फोन अगदी स्वस्तात घरी नेऊ शकता.ड्युअल सिम सपोर्ट असलेला iQOO Z6 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. यात ६.५८ -इंचाची FHD+ स्क्रीन आहे. जी, १२० Hz रिफ्रेश रेट आणि२४० Hz टच सॅम्पलिंग रेटसह येते. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो.

वाचा: Smartphone Offers: ४ हजारांनी स्वस्त झाला १७ मिनिटांत फुल चार्ज होणारा OnePlus चा ‘हा’ पॉप्युलर स्मार्टफोन, पाहा डील

Xiaomi Redmi 9

xiaomi-redmi-9

Amazon Prime Day Sale 2022 मध्ये बजेट किमतीतील स्मार्टफोन्स देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी युजर्सकडे आहे. Xiaomi ची ही स्मार्टफोन सीरीज Amazon वर ६,८९९ रुपयांपासून सुरू होईल. Amazon Prime Day Sale 2022 दरम्यान केवळ अतिरिक्त ऑफरच दिल्या जात नाहीत. तर तुम्हाला कूपन डिस्काउंट देखील मिळेल. ज्यामुळे तुम्ही आणखी ६०० रुपये वाचवू शकाल. कमी पैसे खर्च करून चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास Xiaomi Redmi 9 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा: Smartphone tips: स्मार्टफोन हरवल्यास काळजी करू नका, Google च्या ‘या’ फीचरच्या मदतीने मिनिटात शोधू शकता

iPhone 13

iphone-13

iPhone 13: Apple चे स्मार्टफोन्स आवडतात. पण, त्यांच्या जास्त किंमतीमुळे तुम्ही ते खरेदी करण्यापासून स्वत:ला थांबवत असाल तर, आता तसे करायची आवश्यकता नाही. सेलमध्ये iPhone च्या अनेक मॉडेल्सवर सूट मिळेल. iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max वर २० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. Apple iPhone 13 हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. यात हाय-एंड Apple A१५ Bionic प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे.

वाचा: Smartphone Accessories : हे खास Mobile Coolers गरम स्मार्टफोनला मिनिटांत करतील कूल, किंमतही नाही जास्त, पाहा फीचर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here