नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन एमआय १० () ला ग्लोबल बाजारात लाँच केले होते. कंपनी आता हा स्मार्टफोन भारतात ८ मे रोजी लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. या फोनला भारतात मार्च महिन्यात लाँच करण्यात येणार होते. परंतु, करोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.

वाचाः

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना म्हटले की, या स्मार्टफोनला ८ मे रोजी भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचा लाँचिंग कार्यक्रम ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येऊ शकतो.

वाचाः

ची किंमत
कंपनीने हा स्मार्टफोन तीन पर्यायात बाजाारात उतरवला आहे. ज्यात ८ जीबी रॅम, प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज याचा समावेश आहे. कंपनीने ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९९९ चिनी युआन म्हणजेच ४० हजार रुपये, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४२९९ चिनी युआन म्हणजेच ४३ हजार रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ४६९९ चिनी युआन म्हणजेच ४७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा सेल १४ फेब्रुवारी रोजी चिनी बाजारात सुरू झाला आहे.

वाचाः

Mi 10 ची वैशिष्ट्ये
कंपनीने या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर आधारीत एमआयईयूआय ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कंपनीने या फोमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप (चार कॅमेरे) दिला आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २-२ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्युअल मोड ५जी, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखी फीचर्स दिली आहेत. या फोनमध्ये ४७८० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यात ३० वॅट वायर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here