नवी दिल्लीः भारतात लॉकडाऊन सुरू असताना केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाइननुसार, पहिल्यांदा रेडमी नोट ९ प्रोचा सेल आज उपलब्ध करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता हा सेल सुरू होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन अॅमेझॉन आणि शाओमीची अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येवू शकतो. हा रेडमी नोट ९ सीरिजचा एक भाग आहे.

वाचाः

सरकारच्या नवीन गाईडलाइननुसार, या स्मार्टफोनची विक्री केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोन क्षेत्रात होणार आहे. भारतात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या रेडमी नोट ९ प्रोची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनवर काही ऑफर्स मिळणार आहेत. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड धारकांना ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १ हजार रुपयांची फ्लॅट सूट देण्यात येणार आहे.

वाचाः

ची खास वैशिष्ट्ये

रेडमी नोट ९ प्रो स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आमि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. रेडमी नोट प्रो मॅक्सप्रमाणे नोट ९ प्रोमध्येही ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा चार्जर दिला आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here