नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी टेक्नोने आपला खास स्मार्टफोन ला दक्षिण आफ्रिकेत लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी, चार कॅमेरे, आणि जबरदस्त डिस्प्ले दिला आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनला भारतासह अन्य देशात कधी लाँच करण्यात येणार आहे, यासंबंधीची माहिती कंपनीने अद्याप दिली नाही.

वाचाः

Tecno Spark 5 ची किंमत

कंपनीने या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ३०० रुपये ठेवली आहे. या स्मार्टफोनला ब्लू, ग्रीन, ब्लॅक आणि ऑरेंज या रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनची प्री बुकिंग करता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनचा सेल कधी सुरू होणार आहे, यासंबंधीची माहिती कंपनीने अद्याप दिली नाही.

वाचाः

Tecno Spark 5 ची वैशिष्ट्ये

टेक्नो स्पार्क ५ मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२० x १६०० पिक्सल आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबीचा स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारीत HiOS 6.1 वर काम करतो. तसेच या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप (चार कॅमेरे) ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमधील चौथ्या सेन्सरची माहिती मिळाली नाही. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

Tecno Spark 5 ची बॅटरी
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट यासारखे कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here