दावा

एका हिंदी वृत्तपत्राच्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. या बातमीनुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका साधुच्या चिलममुळे ३०० लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

या बातमीच्या माहितीनुसार, जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात एका मंदिरात ७ साधू राहत आहेत. यातील एका साधूला चिलम ओढायची सवय होती. त्यामुळे करोना संसर्गाची साखळी बनली. मंदिरात आलेल्या भाविकांच्या संपर्कात आल्याने ३०० लोकांना संसर्ग झाला.

पत्रकार अली सोहराब यांनी या बातमीचा फोटो शेअर केला आहे.

अरुणिमा नावाच्या एका अन्य ट्विटर युजरने हा क्लिपिंग फोटो याच दाव्याने शेअर केला आहे.

खरं काय आहे ?

हा दावा खोटा आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) राजस्थानने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

PIB राजस्थानने ट्विट केले की, ‘News Jharkhand नावाच्या एका न्यूज पोर्टलने हा दावा केला आहे की, जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगर क्षेत्रातील एका साधूच्या चिलममुळे ३०० लोकांन करोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्हाधिकारी, जयपूरच्या माहितीनुसार, या बातमीची कोणतीही सत्यता नाही. तसेच या प्रकारची अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

PIB झारखंडनेही हा दावा फेटाळून लावला आहे.

निष्कर्ष

जयपूरमधील साधूच्या चिलममुळे ३०० लोकांना करोनाची लागण झाल्याचा दावा खोटा आहे, असे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here