Smartphones Blast: स्मार्टफोनमध्ये स्फोट होणे आता नवीन राहिले नाही. स्मार्टफोन कितीही महाग असला किंवा प्रीमियम असला तरी फोनमधील काही चुका केल्या तर त्यात स्फोट होऊ शकतो. किंवा फोन एक्सप्लोड होवू शकतो. अनेकदा मॅन्यूफॅक्चरच्या चुकीमुळे सुद्धा फोन मध्ये स्फोट होवू शकतो. तसेच कधी आपल्या चुकांमुळे स्फोट होवू शकतो. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलमधून फोनमध्ये नेमका कशामुळे स्फोट होतो, त्याला नेमके काय कारण आहे. जर काही चुका टाळल्या तर फोनमधील स्फोट टाळता येवू शकतात का, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देत आहोत. आपल्याकडून नकळतपणे काही चुका होतात. या संबंधी काही चुकांसंबंधी माहिती देत आहोत. या चुका टाळल्यास फोनमध्ये स्फोट टाळता येवू शकतो. फोनचा स्फोट हा साधासुधा नसतो. त्याने जीवितहानी सुद्धा होवू शकते. त्यामुळे फोनचा स्फोट होण्यास कारणीभूत असलेल्या चुकांना वेळीच आळा घालता येवू शकतो. जाणून घ्या डिटेल्स.

​मॅन्यूफॅक्चरिंग फॉल्ट

फोनमध्ये स्फोट होण्यास हे सुद्धा एक कारण आहे. मॅन्यूफॅक्चरिंग मध्ये खराबी असेल तर फोन मध्ये स्फोट होतो. फोनमध्ये देण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरीला जर ठीक टेस्ट केले नाही तर हे खराबी मुळे स्फोट होऊ शकतो. ही एक सामान्य बाब आहे. बॅटरीच्या आत सेल्स जास्त टेंबरेचर पर्यंत पोहोचते. यानंतर थर्मल बाहेर निघते. असे मानले जात आहे की, स्वस्त बॅटरीजच्या शॉर्ट सर्किटमुळे हे स्फोट जास्त होण्याची शक्यता आहे.

वाचा: Smartphone Offers: ४ हजारांनी स्वस्त झाला १७ मिनिटांत फुल चार्ज होणारा OnePlus चा ‘हा’ पॉप्युलर स्मार्टफोन, पाहा डील

​थर्ड पार्टी चार्जरचा वापर करणे

ही एक नॉर्मल चूक आहे. आपल्यापैकी अनेक जण असे करतात. कोणत्याही थर्ड पार्टी चार्जरने फोनला चार्ज करणे खूप धोकादायक ठरू शकते. थर्ड पार्टी चार्जरमध्ये नेहमी त्या वस्तूत कमी असते. ज्या हँडसेटना जास्त गरज असते. त्यामुळे थर्ड पार्टी चार्जरने फोनला डॅमेज करू शकता. तसेच फोनमध्ये शॉर्ट सर्किट होवू शकते. त्यामुळे कोणत्याही स्मार्टफोनला थर्ड पार्टी चार्जरने फोन चार्ज करणे टाळावे, आपल्या स्मार्टफोनचा ओरिजनल चार्जर सोबत ठेवावा. प्रवासात किंवा ऑफिसात चार्ज करताना ओरिजनल चार्जरचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.

वाचा: Smartwatches In India: आरोग्याची चिंता सोडा, स्वस्तात खरेदी करा ‘या’ टॉप स्मार्टवॉच, किंमत आणि फीचर्स पाहा

​रात्रभर चार्ज करणे

फोनला रात्रभर चार्जरवर लावणे खूपच धोकादायक आहे. आमच्यापैकी अनेक जणांना अशी सवय लागलेली आहे. फोनला रात्रभर चार्जिंगला लावून झोपी जातात. फोनला रात्रभर चार्जिंगला लावल्याने फोनची बॅटरी फुगते. प्रमाणाबाहेर चार्जिंग केल्याने फोनला नुकसान होऊ शकते. फोनमध्ये स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. फोनला जास्त चार्जिंग केल्याने त्यात ओवरहीटिंग, ओवरचार्जिंग, शॉर्ट-सर्किट सारखी समस्या निर्माण होवू शकते. अनेक स्मार्टफोन आता एका चिपसोबत येतात. बॅटरी लेवल १०० टक्के झाल्यास करंटला अडथळा निर्माण करतो. परंतु, ही जुन्या फोन्समध्ये ही सुविधा उपलब्ध होत नाही.

वाचा: Smartphone Accessories : हे खास Mobile Coolers गरम स्मार्टफोनला मिनिटांत करतील कूल, किंमतही नाही जास्त, पाहा फीचर्स

फोनला गर्मी किंवा उन्हात ठेवू नका

जास्त गरमी फोनच्या बॅटरीला खराब करू शकते. याने सेल्सला थोडे अस्थीर करते. तसेच एक्जोथिर्मिक ब्रेकडाउन निघून जाते. याने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारखी गॅस निघते. नंतर फोनमध्ये स्फोट होवू शकतो. कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन असू द्या. किंवा स्मार्टफोन कितीही महागडा असू द्या. परंतु, त्या स्मार्टफोनला जास्त काळ उन्हात किंवा गरमीत ठेवणे हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्मार्टफोनला जास्त काळ अशा ठिकाणी ठेवणे टाळावे.

वाचाः Vivo Y15c च्या किंमतीत ४४९१ रुपयाची मोठी कपात, ग्राहकांची खरेदीसाठी उडाली झुंबड, पाहा नवी किंमत

​यूजरची चूक

स्मार्टफोनला यूजर्स अनेकदा उन्हात किंवा गरमीत ठेवत असतो. यूजर्संच्या चुका सुद्धा फोनच्या स्फोटाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे सर्वच यूजर्संनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. उदाहरणासाठी रियलमी ५ मध्ये त्याकाळी स्फोट झाला होता. ज्यावेळी यूजर आपल्या मोटरसायकलवर जात होता. कंपनीने तपासणी केल्यानंतर दावा केला की, फोनमध्ये स्फोट होण्यास एक्सटर्नल फोर्स केल्याने जबाबदार आहे. त्यामुले अशा कोणत्याही पद्धतीच्या एक्सटर्नल फोर्स लावण्यापासून आपण लांब राहायला हवे.

वाचाः आज येताहेत Oppo चे दोन पॉवरफुल स्मार्टफोन्स, ११ मिनिटात होतील ५० % चार्ज, कॅमेराही जबरदस्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here