नवी दिल्लीः आरोग्य सेतू मोबाइल अॅप तयार करणाऱ्या नीती आयोगाने आणि पंतप्रधान यांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांनी आरोग्य सेतू मित्र (AarogyaSetu Mitr) नावाची वेबसाइट लाँच केली आहे. या नव्या वेबसाइटमुळे लोकांना करोना व्हायरस संबंधीत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सरकारने या वेबसाइटसाठी ई-संजीवनी ओपीडी, स्वस्थ, स्टेप वन, टाटा ब्री – डिजिटल हेल्थ आणि टेक महिंद्रा कनेक्टसेन्स यांच्यासोबत करार केला आहे.

वाचाः

लोकांना अशी मिळणार सुविधा
या पोर्टलवर लोकांना ऑडिओ कॉल, मेसेज, चॅट आणि व्हिडिओ कॉलवरून कोविड-१९ व्हायरस संदर्भातील आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच १ एमजी, डॉ. लाल पॅथलॅब्स, मेट्रोपोलीस, एसआरएल डायग्नोस्टिक्स आणि थायरोकेअर यासारख्या थर्ड पार्टी कंपन्या होम लॅब टेस्टची सुविधा देणार आहेत.

वाचाः

अॅपवरून ही साईट ओपन करता येणार
आरोग्य सेतू मित्र साईटला आरोग्य सेतू मोबाइल अॅपवर जाऊन सुद्धा ओपन करता येऊ शकणार आहे. युजर्संना कन्सल्ट डॉक्टर, होम लॅब टेस्ट आणि ईफार्मसी असा पर्याय दिसेल. युजर्संना आपल्या सोयीनुसार या तीन पर्यायापैकी एका पर्यायावर जाऊन एकाची निवड करावी लागणार आहे. या सेवेसाठी साईटवर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. थोडी माहिती भरावी लागणार आहे.

वाचाः

२५ शहरात काम करणार हे पोर्टल
भारतातील २५ शहरात काम करणार आहे. या शहरात घरा-घरात जाऊन नमूने जमा करण्यात येतील. तसेच या शहरात लोकांना ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करून सुद्धा डॉक्टरचा सल्ला घेता येऊ शकणार आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here