नवी दिल्लीः लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरात बसावे तसेच त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने दिग्गज टेक कंपनी गुगलने एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहीम अंतर्गत गुगल प्रसिद्ध गेम घेऊन येत आहे. गुगलने नुकतेच मेक्सिकन गेम Loteria आणला होता. आता या मोहीम अंतर्गत गुगलने आज Halloween गेमचे खास डुडल बनवले आहे.

वाचाः

Halloween गेमची माहिती
२०१६ मध्ये गुगलने Halloween उत्सव साजरा करण्यासाठी एका गेमचे आयोजन केले होते. आज हा गेम छोट्या मुलांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत खेळतात.

असे खेळा Halloween गेम
जर तुम्हाला हा गेम खेळायचा आहे. तर सर्वात आधीत तुम्हाला गुगलच्या डुडलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. त्यावर एक बटन दिसेल. या बटनवर टॅप केल्यास तुम्ही सरळ गेममध्ये पोहोचाल. या ठिकाणी काही सूचना मिळतील. गेम समजू घेण्यासाठी या सूचना तुम्हाला मदत करतील.

वाचाः

या गेममध्ये मांजराला वाचवायचे आहे. ही मांजर भुतामध्ये अडकली आहे. या मांजराला आपल्या माऊसच्या मदतीने भुतांच्या वर असलेल्या सिम्बॉलला ड्रा करायचे असते. व्यवस्थित सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर तुम्ही गेमच्या पुढे जाता. जर सिम्बॉल चुकीचा असेल तर गेम संपतो. मग तुम्हाला पुन्हा खेळावा लागतो. या गेममुळे तुमचा वेळ चांगला जातो, असा कंपनीचा दावा आहे.

याआधी गुगलने Loteria गेम लाँच केला होता
गुगलने याआधी आपल्या डुडलमध्ये Loteria गेम दाखवला होता. हा एक मॅक्सिकन गेम आहे. तसेच तो लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here