वाचाः
या कॉन्फ्रेसिंग संबंधी अॅपल कंपनीने काही खास माहिती अद्याप शेअर केली नाही. परंतु, २२ जून रोजी होणाऱ्या कॉन्फ्रेसिंगमध्ये आयओएस १४ आणि वॉचओएस ७ लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन मॅक ओएस, आयपॅड ओएस आणि टीव्ही ओएस लाँच होण्याची शक्यता आहे. या कॉन्फ्रेसिंगमध्ये सहभागी होणारे सर्व डेव्हलपर्स, अॅपल डेव्हलपर्स अॅप डाऊनलोड करू शकतात. या अॅपवरून त्यांना या कॉन्फ्रेसिंग संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. या अॅपवरून त्यांना कीनोट सुद्धा मिळणार आहे.
वाचाः
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपलच्या या कार्यक्रमात आयओएस १४ सोबत एक नवीन फिटनेस अॅप लाँच होऊ शकतो. ज्यात युजर्संना फिटनेस ट्रेनरचे व्हिडिओज डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच आयमेसेज मध्येही अपडेट करण्यात येणार आहे. या मेसेजचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर यात एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. गेल्या महिन्यात एक रिपोर्ट समोर आला होता. त्यात दावा करण्यात आला होता की, अॅपल वॉच ओएस७ मध्ये किड्स मोड मिळणार आहे. या मदतीने आपल्या आयफोनवरून एकापेक्षा अधिक अॅपल वॉच कनेक्ट करू शकता येतील. नवीन ओएसमध्ये स्कूटटाईम फीचर मिळू शकतो.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times