@AbhijitBanerj हँडल अकाउंटवरून पहिल्याच दिवशी अभिजीत बॅनर्जी यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला. या फोटोत त्यांची पत्नी आणि नोबेल पुरस्कार विजेते एस्थर डुफ्लो दिसत आहेत. फोटोसोबत लिहिले की, थोडे उशिरा, पण अखेर ट्विटरवर आलो.
अकाउंटच्या बायोवरून हे अकाउंट खरे वाटत होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी या अकाउंटला २६ हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले.
या ठिकाणी पाहा अभिजीत बॅनर्जी यांचे फेक ट्विटर अकाउंट
खरं काय आहे ?
अभिजीत बॅनर्जी ट्विटरवर नाहीत. त्यांच्या नावाने बनवण्यात आलेले दोन्ही अकाउंट फेक आहेत.
बीबीसी न्यूज इंडियाचे प्रतिनिधी Soutik Biswas ने एक ट्विट केले. ज्यात त्यांनी म्हटले की, अभिजीत बॅनर्जी ट्विटरवर नाहीत.
त्यांनी ट्विट केले त्याचे भाषांतर असे आहे. अर्थशास्त्रज्ञ अभिजीत विनायक बॅनर्जी यांच्याकडून आलेला मेसेज. जर तुम्ही सोशल मीडियावर आहात. तर तुम्ही याचा प्रचार कराल की, माझ्या नावाने AbhijitBanerj हँडलवर अकाउंट बनवण्यात आले आहे. पण, मी ट्विटरवर नाही.
आता हे दोन्ही फेक अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत.
निष्कर्ष
नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांचे ट्विटरवर अधिकृत अकाउंट नाही. त्यांच्या नावाने बनवलेले अकाउंट फेक आहे. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times