नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी भारतातील बाजारात सध्या टॉपवर आहे. कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात जबरदस्त मागणी आहे. शाओमीच्या रेडमी नोट ८ या स्मार्टफोन सीरिजने ग्लोबल सेलमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीने म्हटले की, शाओमीच्या या फोन सीरिजने जगभरात ३ कोटीहून अधिक विक्री केली आहे. जगभरात या स्मार्टफोनला खूप मागणी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

वाचाः

शाओमीचे ग्रुप उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंग यांनी चायनीज मायक्रोब्लॉगिंग साईट विबोवर शेअर केलेल्या एका पोस्टमधून ही माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टच्या माहितीनुसार, सेलच्या पहिल्या महिन्यात रेडमी नोट ८ सीरिजने १० लाखांहून अधिक स्मार्टफोनची विक्री केली होती. दोन महिन्यानंतर या स्मार्टफोनच्या सीरिजने ५० लाख स्मार्टफोनची विक्री केली. रेडमी नोट ८ सीरिजच्या १ कोटी फोनची विक्री केवळ सेलच्या तीन महिन्यात झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा एक नवीन रेकॉर्ड होता, असेही कंपनीने म्हटले आहे. नवीन स्मार्टफोन सीरिजच्या विक्रीने आधीच्या रेडमी नोट ७ सीरिजचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

वाचाः

रेडमी नोट ८ प्रो चे वैशिष्ट्ये

यात ६ जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी नोट 8 हा Android ९ वर आधारित MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. डिस्प्लेबद्दल सांगायचे तर यात ६.३९ इंचांचा फुल एचडी + डिस्प्ले आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेन्सर आहे, जो मॅक्रो लेंससह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन १२८ जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येतो आणि आवश्यकता असल्यात ही मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here