सॅमसंग
सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनला जगभरात मागणी आहे. जगभरात २० टक्के बाजार व्यापला आहे. सॅमसंग स्मार्टफोनच्या विक्रीन नंबर वन स्थानावर आहे. सॅमसंगने २०२० च्या पहिल्या तिमाहीत ५.९ कोटी फोनची विक्री केली आहे.
हुवेई
चीनची स्मार्टफोन कंपनी हुवेईने १७ टक्के बाजार व्यापला आहे. यासह हुवेई दोन नंबर स्थानावर पोहोचली आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत ४.९ कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे.
अॅपल
आयफोन बनवणाऱ्या अॅपलने २०२० च्या पहिल्या तिमाहित ४ कोटी आयफोनची विक्री केली आहे. आयफोनने १४ टक्के बाजार व्यापला आहे. अॅपल तिसऱ्या स्थानावर आहे.
शाओमी
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी चौथ्या नंबरवर आहे. शाओमीने २०२० च्या पहिल्या तिमाहीत २.९७ कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे.
ओप्पो
ओप्पोला या यादीत पाचवे स्थान मिळाले आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत जगभरात ओप्पोने २.२३ कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे.
विवो
चीनची स्मार्टफोन कंपनी विवो सहाव्या स्थानावर आहे. विवोने २०२० च्या पहिल्या तिमाहीत २.१६ कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे.
रियलमी
रियलमीच्या स्मार्टफोनला जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत रियलमीचे ७२ लाख स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. विवो सातव्या स्थानावर आहे.
लिनोओ
आठव्या नंबरवर लिनोओ ग्रुप आहे. लिनोओ आणि मोटोच्या स्मार्टफोनचा यात समावेश आहे. लिनोओने ५० लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे.
एलजी
दक्षिण कोरियाची कंपनी एलजी नवव्या स्थानावर आहे. एलजीच्या २०२० च्या पहिल्या तिमाहीत ६९ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे.
टेक्नो
टेक्नो दहाव्या स्थानावर आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत टेक्नोने ४७ लाख स्मार्टफोनची जगभरात विक्री केली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times