नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी एलजीने आपला प्रसिद्ध वेलवेटला स्टायलस सोबत दक्षिण कोरियात लाँच केले आहे. युजर्संना या स्मार्टफोनमध्ये ओएलईडी डिस्प्ले, ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि तीन कॅमेऱ्याचा सपोर्ट देण्यात आला आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच करण्यात येणार याविषयी कंपनीने अद्याप माहिती दिली नाही.

वाचाः

स्मार्टफोनची किंमत
एलजी वेलवेट स्मार्टफोनची किंमत ५५ हजार ९०० रुपये आहे. या स्मार्टफोनला ग्रीन, ग्रे आणि व्हाईट इल्यूशन सनसेट या कलरमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनची विक्री १५ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

LG Velvet स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा ओएलईडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी चिपसेट सोबत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० आऊट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. एलजी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचरसह ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये वायफाय, जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे कनेक्टिविटी फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here