दावा
व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप शेअर केला जात आहे. या मेसेजच्या माहितीनुसार चा स्तर वाढवल्यानंतर करोना व्हायरसवर मात करता येते.

मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, करोना व्हायरसचा पीएच स्तर ५.५ ते ८.५ दरम्यान आहे. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी अशा खाद्य पदार्थांचे सेवन करावे ज्यांचा पीएच स्तर यापेक्षा जास्त असेल.

मेसेजमध्ये हेही सांगितले की, लिंबू, चुना, अॅवोकॅडो, लसून, आंबा, अननस इत्यादीमध्ये पीएच स्तर करोना व्हायरसपेक्षा जास्त आहे.

हा मेसेज व्हॉट्सअॅपवर इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत शेअर केला जात आहे.

येथे पाहा मेसेजः

खरं काय आहे?

हा मेसेज भ्रमित करणारा आहे. या मेसेजमधून चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसच्या पीएच स्तरांसंदर्भात कोणताही डेटा जारी केला नाही.

कशी केली पडताळणी ?

संबंधित की वर्ड्स सर्च केल्यानंतर आम्हाला ३० मार्च २०२० रोजी छापलेली Telangana Today ची एक
मिळाली.

या बातमीचे शीर्षक ‘Boost immunity and don’t fret over pH level of होते. तसेच ही बातमी न्यूज एजन्सी IANS च्या हवाल्याने लिहिली होती.

या बातमीत म्हटले होते की, आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इम्यूनिटी वाढवणे महत्त्वपूर्ण आहे. परंतु, करोना व्हायरसचा पीएच स्तर केवळ भ्रमित करणारी माहिती आहे.

IANS ने ऑनलाइन हेल्थकेअर प्लेटफॉर्मवर Lybrate मध्ये इंटरनल मेडिसीन स्पेशलिस्ट डॉक्टर मनीष माथूर यांच्या माहितीनुसार, खूप माहिती उपलब्ध आहे. परंतु, याला कोणताही आधार नाही. किंवा ते सत्य असल्याचे ठरवले जाऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसचा पीएच स्तरांवरून कोणताही डेटा जारी केलेला नाही. शरीरात इम्यूनिटी वाढवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शरीरात इम्यूनिटी जितकी मजबूत असेल तितकेच आपण संसर्ग रोगांविरोधात लढाई लढण्यासाठी सक्षम असू, असे माथूर यांनी सांगितले.

निष्कर्ष

करोना व्हायरसच्या पीएच स्तर वाढवण्यासंबंधी कोणताही डेटा आतापर्यंत जारी करण्यात आला नाही. यासंबंधीचा व्हायरल होत असलेला मेसेज केवळ भ्रमित करणारा आहे, असे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here