| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 22, 2022, 1:07 PM

how to book irctc tatkal ticket : रेल्वेने प्रवास करणे म्हणजे स्वस्त आणि सुरक्षित प्रवास आहे. म्हणून देशातील अनेक लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देत असतात. परंतु, अनेकदा रेल्वेचे तिकिट कन्फर्म होत नाही. यासाठी रेल्वेकडून तात्काळ तिकिटाची सुविधा दिली जात आहे.

 

irctc tatkal ticket

हायलाइट्स:

  • घरात बसून रेल्वेचे तात्काळ तिकिट बुक करा
  • रेल्वेच्या IRCTC वेबसाइटवरून बुक करू शकता
  • या वेबसाइटवरून रेल्वेचे तिकिट बुक करणे खूपच सोपे
नवी दिल्लीः irctc tatkal ticket booking : बस आणि विमानाच्या तुलनेत रेल्वेचे तिकिट हे स्वस्त समजले जाते. तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला रेल्वेचे तिकिट बुकिंग करायला हवे. परंतु, कन्फर्म तिकिट, रेल्वेच्या सिटाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. परंतु, अशावेळी IRCTC ची Tatkal Ticket ची सुविधा तुम्हाला उपयोगी पडू शकते. भारतीय रेल्वेची ही सुविधा प्रवाशांना नेहमीच उपयोगी पडते. आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटवरून तात्काळ रेल्वेचे तिकिट कसे बुक करतात यासंबंधीची सोपी ट्रिक्स सांगणार आहोत. एसी क्लाससाठीच्या तात्काळ बुकिंगसाठी सकाळी १० वाजेपासून सुरुवात होते तर स्लीपर क्लाससाठी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होते.

IRCTC च्या वेबसाइटवरून तात्काळ तिकिट बुक करण्याची सोपी प्रोसेस
यूजर नाव आणि पासवर्ड सोबत IRCTC ची वेबसाइट लॉगइन करा.
यानंतर फ्रॉम – टू स्टेशनची माहिती भरा. प्रवास करण्याची तारीख आणि Class of travel (स्लीपर, एसी आदी) माहिती भरा.
ड्रॉपडाउन मेन्यू वरून कोटा मध्ये जावून तात्काळ ऑप्शनला सिलेक्ट करा.
तात्काळ सिमचे अडवॉन्स्ड रिझर्वेशन पीरियड आता दोनने कमी करून १ केले आहे. पुढील पेजवर तुम्हाला सिलेक्ट करण्यात आलेल्या रूटसाठी ट्रेनची लिस्ट तुम्हाला दिसेल.
जर तुम्हाला ट्रेनचा रूट आणि टायमिंग पाहायची असेल तर Train Schedule (ट्रेन शेड्यूल) लिंकवर क्लिक करू शकता.
ट्रेन लिस्टमध्ये ट्रेन सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये Type of Class वर क्लिक करा. ट्रेन लिस्टमध्ये Quota ऑप्शन उपलब्ध आहे.
यानंतर सिंगल अडल्ट प्रवाशाच्या तिकिटाचे भाडे दिसेल.
जर तुम्ही दुसरी ट्रेन सिलेक्ट करीत असाल तर त्यावर ट्रेनचे नाव लिहून त्यावर क्लिक करा.
सिलेक्ट करण्यात आलेल्या तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी ‘Book Now’ बटन वर क्लिक करा.
तात्काळ ई-तिकिट दरम्यान PNR वर जास्तीत जास्त ४ प्रवाशांचे तिकिट बुक करता येवू शकते.
यानंतर प्रवासी रिझर्वेशन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी ट्रेनचे नाव, स्टेशन, क्लास आणि प्रवास करण्याची तारीख तपासू शकता.
तात्काळ कोट्यात सीनिअर सिटिजनला सूट मिळत नाही.
जर चार्ट बनल्यानंतर ऑटोमॅटिक क्लास अपग्रेड हवा असेल तर Consider for Auto Upgradation या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर व्हेरिफिकेशन कोड एन्टर करा.
बुकिंग आणि कँसिलेशन संबंधी फ्री एसएमएस मिळवण्यासाठी प्रवासी मोबाइल नंबर एन्टर करू शकता.
आता Continue बटनवर क्लिक करा.
ट्रेनचा क्लास, कोटा संबंधी माहितीत बदल करायचा असेल तर Back बटन प्रेस करू शकता.
यानंतर तिकिटाची माहिती, एकूण भाडे, व सिटची उपलब्धता संबंधीची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
प्रवाशांची कोणतीही माहिती बदलण्यासाठी बॅक बटनचा वापर करू शकता.
सर्व डिटेल्स चेक केल्यानंतर पेमेंटसाठी Continue बटन वर क्लिक कार.
पेमेंट गेटवे मेन्यू मध्ये आपल्या सुविधेनुसार, पेमेंट ऑप्शनची निवड करा.
निवडलेल्या बँकेच्या वेबसाइटवर रीडायरेक्ट करण्यासाठी Pay & Book बटनवर क्लिक करा.
यानंतर रिझर्वेशनसाठी देण्यात आलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.
बुकिंग कन्फर्मेशन मेल तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीयवर येईल.

वाचाः भन्नाट फीचर्ससह ७ दिवसांपर्यतची बॅटरी लाईफ देणाऱ्या बेस्ट स्मार्टवॉचेस, किंमत २,००० पेक्षा कमी

वाचाः अलर्ट! Google Play Store ने हटवले ५० हून जास्त धोकादायक अॅप्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : how to book irctc tatkal ticket booking user know easy process step by step
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here