नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे खूप सारे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान आहेत. कंपनीकडे जिओ टॉप अप व्हाऊचर ४जी डेटा व्हाऊचर आहे. मुकेश अंबानी यांच्या नेत्तृत्वाखाली जिओने खूप कमी कालावधीत देशातील देशातील सर्वात मोठी बनवण्याचे ध्येय गाठले आहे. आयएसडी प्लान सुद्धा आहे. म्हणजेच जर तुम्हाला विदेशला जायचे असेल तर या रिचार्ज प्लानला स्वस्त कॉल दर आणि डेटाचा फायदा मिळू शकतो.
वाचाः
रिलायन्स जिओचा आयएसडी प्लान हा कंपनीचा ग्लोबल आयएसडी पॅक आहे. या प्लानला संपूर्ण देशात घेऊन जाऊ शकतो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानची किंमत फक्त ५०१ रुपये आहे. या ५०१ रुपयांत ५५१ रुपयांचा टॉकटाईम मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. याशिवाय जिओच्या वेबसाइटवर वेगवेगळ्या देशांतील कॉल दराची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. सर्व देशांच्या कोडची माहिती सुद्धा या ठिकाणी दिली आहे. जर तुम्हाला ग्लोबल आयएसडी पॅक खरेदी करायचा नसेल तर तुम्ही स्वस्त कॉल दराचा आनंद घेऊ शकता. जिओ कंपनीचे या शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय रोमिंग रिचार्ज पॅक आहे. या रिचार्ज प्लानची सुरुवात ५७५ रुपयांपासून सुरू होऊन ती ५ हजार ७५१ रुपयांपर्यंत आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times