नवी दिल्लीः व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात पसरला आहे. करोनावर लस बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. आता हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेटक्ट करण्यासाठी एका नव्या रोबोटचा वापर करण्यात येत आहे. या मशीनने केवळ २ मिनिटात करोना व्हायरसचा खात्मा करतो. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या रोबोटचा अनेक ठिकाणी वापर करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

वाचाः

अमेरिकेच्या टेक्सासच्या Xenes Disinfection Services ने नुकतीच लाइट स्ट्राईक रोबोटची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. हा रोबोट कोविड १९ विरोधात लढाई देतो. या मशीनला जपानमध्ये मेडिकल उपकरण बनवणारी कंपनी Terumo ने विकले होते. हे २०० ते ३१२ नॅनोमीटर या दरम्यान वेवलेंथ वर प्रकाश (लाइट) टाकतो. बेड्स, दरवाजे, हँडल, आणि ज्या ठिकाणी लोक सर्वात जास्त हात लावतात. त्याला डिसइन्फेक्ट करण्याचे काम रोबोट करतो.

वाचाः

केवळ दोन ते तीन मिनिटात अल्ट्राव्हायलेट रेडिएशन व्हायरसचा खात्मा करते. रोबोट दुसऱ्या मल्ट्री-ड्रग रेसिस्टेंट बॅक्टिरिया आणि इबोला व्हायरस विरुद्ध लढाईत जबरदस्त यशस्वी झालेला आहे. करोना व्हायरस एन ९५ मास्कला एलिमिनेट करण्यातही ९९.९९ टक्के इफेक्टिवनेस दाखवले आहे. जगभरातील ५०० हॉस्पिटलमध्ये या रोबोटचा वापर करण्यात येत आहे. Terumo ने २०१७ मध्ये याचे वाटप अधिकार मिळवले होते. या रोबोटची किंमत १५ मिलियन येन (१ कोटी रुपये) हून जास्त या मशीनची विक्री आहे. संकटावेळी या डिव्हाईसची मागणी वाढेल, असा अंदाज आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here