नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी शाओमीने () च्या एका जाहिरातीवरून माफी मागितली आहे. शाओमीने ही जाहीरात जपानमध्ये दाखवली होती. शाओमीने फॅट मॅन आणि अणू बॉम्ब दिसत असलेले आभाळ यासोबत फोनची जाहीरात दाखवली होती. अणू बॉम्ब चा वापर करण्यासाठी अमेरिकेने फॅट मॅन कोडचा वापर केला होता. दुसऱ्या युद्धात जपानच्या नागासाकी शहरात हा अणू बॉम्बचा हल्ला करण्यात आला होता. या जपानच्या नागासकी शहाराचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते.

वाचाः

शाओमीने आपल्या स्मार्टफोनच्या जाहिरातीत अणू बॉम्बचा उल्लेख कशासाठी केला होता. याचे नेमके कारण अद्याप उघड झाले नाही. या जाहीरातीतील व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर या मेसेजमधून ग्राहकांना सांगण्याचा प्रयत्न करते की, नोट ९ प्रो हा अणू बॉम्ब इतकाच पॉवरफुल आहे. या जाहीरातीत फॅट मॅन चा उल्लेख करण्याबरोबरच स्फोटक ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. रेडमी नोट ९ प्रोच्या या जाहिरातीवर टीका झाल्यानंतर शाओमीने तत्काळ हा व्हिडिओ हटवला आहे. तसेच कंपनीने माफी मागितली आहे. शाओमीने जपानी भाषेत ही माफी मागितली आहे. परंतु, अँड्रॉयड अॅथोरिटीने याचे भाषांतर केले आहे.

वाचाः

शाओमीने माफी मागताना म्हटले की, ओवरसीज मार्केटसाठी लेटेस्ट प्रोडक्टचे प्रमोशन करताना चुकीच्या मजकुराचा वापर करण्यात आला होता. परंतु, व्हिडिओ आता काढून टाकला आहे. शाओमी जगभरातील युजर्स आणि सभ्यतेचा सन्मान करते. नवीन प्रमोशन करताना आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचू. भविष्यात असे काही होणार नाही, यासाठी प्रयत्न करू. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करू, असे शाओमीने म्हटले आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here