Smartphone Usage Important Tips : आज स्मार्टफोन वापरणे सामान्य बाब झाली आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असंख्य जण स्मार्टफोनचा वापर करीत असतात. तरुण पिढी तर स्मार्टफोनमध्ये रात्र दिवस बुडालेली आहे. स्मार्टफोन शिवाय, त्यांचं कोणतेही काम होत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक जण तर स्मार्टफोनवरील गेमच्या आहारी गेलेले सुद्धा आपल्याला दिसतात. शाळा, ऑफिसवरून घरी परतल्यानंतर रात्रभर स्मार्टफोनवरून चॅटिंग करण्याची आणि म्यूझिक ऐकण्याची अनेकांना सवय असते. स्मार्टफोन शिवाय, एक मिनिट सुद्धा दूर न राहणाऱ्यांची संख्या सुद्धा आता प्रचंड वाढली आहे. अनेक जण तास न तास स्मार्टफोनचा वापर करीत आहेत. परंतु, स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्याचा अतिरिक्त वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. डोळ्याचा आजारासह अनेक आजार स्मार्टफोनच्या अतिरेक वापरामुळे होवू शकतात. तुम्ही जर तास न तास स्मार्टफोनचा वापर करीत राहिल्यास तुम्हाला कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर (Brain Tumour) सारखा आजार होण्याची भीती आहे. जाणून घ्या डिटेल्स.

​स्मार्टफोनचा अतिरेक वापरामुळे जीवघेणा आजार होवू शकतो

अनेक जण स्मार्टफोनचा अतिरेक वापर करीत आहेत. यात छोट्या मुलांचा सर्वात जास्त वाटा आहे. गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनचा वापर तास न तास केला जातो. परंतु, स्मार्टफोनचा वापर आरोग्यासाठी चांगला नाही. या स्मार्टफोनमधून जीवघेणे (radiations) निघत असतात. ते डोळ्यासाठी चांगले नाहीत. व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. स्मार्टफोनचा वापर करीत असताना यातून एक प्रकारची रेडियो फ्रीक्वेन्सी (RF) रेडिएशन निघत असतात. याचा आपल्या शरीरावर, डोक्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. मोबाइल्समधून निघणाऱ्या रेडिएशन्स व्यक्तीच्या ब्रेन ट्यूमरवर परिणाम करतात. याची शक्यता ४० टक्के वाढते. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करा iPhone 13, पाहा डिस्काउंट

फोनवर बोलताना व्हा सावध

स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आणि जबरदस्त सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु, फोनचा सर्वात जास्त वापर हा कॉलिंगसाठी केला जातो. अनेक जण फोनवर तास न तास बोलत असतात. कानाला लावलेला फोन तासांहून जास्त चिकटलेला असतो. यात महिलांचा जास्त सहभाग आहे. जर तुम्ही फोनचा जास्त वापर करीत असाल तर कॉलवरील रेडिएशन्स खूप वाढले जातात. त्यामुळे तुम्ही नेहमी फोनला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, किंवा फोनवर शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करा. कारण, प्रत्येक ३० सेकंदात फोनमधून हीट रेडिएशन निघत असतात. ते शरीराच्या प्रमुख अवयवांना खराब करण्याचे काम करीत असतात.

वाचाः स्टेशनला जाण्याची गरज नाही, घरात बसून बुक करा रेल्वेचे तात्काळ तिकिट

​यावेळी स्मार्टफोनचा वापर करणे टाळा

स्मार्टफोन शिवाय दूर राहणे आता अनेकांसाठी अवघड झाले आहे. दर पाच दहा मिनिटाला फोनला हातात घेऊन नवीन काय मेसेज आला याची तपासणी अनेकांकडून केली जाते. बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करीत असताना खिशात फोन ऐवजी अनेकांच्या हातात फोन असतो. तसेच ते फोनमध्ये काही ना काही तरी करीत असतात. परंतु, असं करणं हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. कारण, अशावेळी फोनमधून रेडिएशन जास्त बाहेर पडत असतात. तसेच तुमची गाडी पार्क केलेली असेल किंवा त्यात तुम्ही बसलेले असाल आणि तुम्ही तुमच्या फोनचा वापर करीत असाल तर हे सुद्धा धोकादायक आहे. जवळपासच्या गाड्यांमधून बाहेर पडणारी हिट आणि मोबाइल मधून बाहेर पडणारे रेडिएशनमुळे तुम्हाला नुकसान होवू शकते.

वाचाः पहिल्याच सेलमध्ये Redmi K50i 5G वर जबरदस्त ऑफ, १० हजारात मिळणार २५ हजारांपेक्षा अधिक किमतीचा फोन

​झोपण्यापूर्वी करा हे काम

आपल्यापैकी अनेक जणांना वाईट सवय आहे. आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर कधीही करतो. रात्री झोपताना स्मार्टफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन आणि अनेक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स (EMF) स्लीप सायकलला खराब करण्याचे काम करतात. अनेकांना घाबरायला (Palpitations) होवू शकते. तसेच तुम्हाला कमजोरी सुद्धा येवू शकते. याचा इम्यून सिस्टमवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे झोपताना नेहमी स्मार्टफोनला दूर ठेवा. जर तुमचे डोके दुखणे, चक्कर येणे, दम लागणे किंवा कमजोरी येत असेल तर याचे कारण फोनचा जास्त वापर करणे, हे सुद्धा एक कारण असू शकते.

वाचाः वीज मीटर सोबत फिट करा ही २५० रुपयाची डिव्हाइस, बील अर्धे कमी येणार

स्मार्टफोनला दूर ठेवणे मोठे आव्हान

आज स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक ऑनलाइन कामे स्मार्टफोनवरून केली जात आहेत. स्मार्टफोनमुळे काही अशक्य गोष्टी शक्य झाल्या असल्या तरी आरोग्याचे मात्र नुकसान करणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे अनेक जणांकडून स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. जिम मध्ये जावून व्यायाम करणे अनेकांना अवघड काम वाटते. परंतु, त्यापेक्षाही स्मार्टफोनला दूर ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. अनेक जण स्मार्टफोन शिवाय राहूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने स्मार्टफोन जितके जास्त दूर ठेवाल तितके तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल. त्यामुळे हे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे.

वाचाः आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करा iPhone 13, पाहा डिस्काउंट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here