दावा

हातात काही तरी सामान आणि मास्क घातलेल्या एका महिलेचा व्हिडिओ या दाव्यासह शेअर केला जात आहे की, ही महिला बॉलीवूड अभिनेत्री आहे.

दीपिका दारू खरेदी करीत असल्याचा दावा सुद्धा या व्हिडिओतून केला जात आहे.

एक ट्विटर युजर Ravindra Vishnu Laxmi Sankpal ने या व्हिडिओला ट्विट करीत लिहिले की, समाजवादी दीपिका पादुकोन लॉकडाऊनमध्ये राज्याच्या तिजोरीत आपले आर्थिक योगदान देताना. मला वाटते की, हे लोक दारू शिवाय राहू शकत नाही.

व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर सुद्धा याच दाव्याने शेअर केला जात आहे.

खरं काय आहे ?

व्हिडिओत दिसत असलेली महिला ही बॉलिवूड आहे. दीपिका पादुकोन नाही. रकुल प्रीत सिंहच्या माहितीनुसार, ती मेडिकलमधून बाहेर पडली आहे. दारुच्या दुकानातून नाही.

कशी केली पडताळणी ?

संबंधित की वर्ड्स सर्च केल्यानंतर आम्हाला ८ मे रोजी छापलेली टाइम्स ऑफ इंडियाची बातमी मिळाली. ज्यात रकुल प्रीत सिंहने दारू खरेदीच्या दाव्यांवर स्पष्टीकरण देत ही चुकीची माहिती असल्याचे सांगितले होते.

या बातमीचे शीर्षक ‘Rakul Preet busts rumours about buying alcohol’ होते. या बातमीत रकुल प्रीत सिंहच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट सुद्धा होते. यात दारू खरेदीच्या दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

सिंहने या खोट्या दाव्याच्या ट्विटला कोट करताना लिहिले होते की, अरे वाह! मला माहिती नव्हते की, मेडिकल स्टोरवर दारू मिळते.

सिंहच्या ट्विटवरून हे स्पष्ट होते की, व्हिडिओत रकुल आहे. दीपिका पादुकोन नाही.

निष्कर्ष

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे. दीपिका पादुकोन या व्हिडिओत दिसत नसून रकुल प्रीत सिंह आहे, असे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here