बेंगळुरूः करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमध्ये लोक कशाला प्राधान्य देत आहे, हेही बदलले आहे. लोक आता गुगलवर अनेक नवीन वस्तू सर्च करीत आहेत. यात करोना व्हायरसच्या विम्यापासून ते हॉरर चित्रपटांचा समावेश आहे. देशभरात करोनाचा कहर वाढल्याने लोक आता इम्युनिटी वाढवण्यासाठी नवीन-नवीन उपाय शोधत आहेत. लोकांनी ऑनलाइन क्लासेस, यूपीआय ट्रान्झक्शन्स सुद्धा खूप सर्च केले आहेत. गुगलने नुकताच या संदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे.

वाचाः

गुगलने भारत काय सर्च करीत आहे? (What is india Searching for). हा रिपोर्ट जारी केला आहे. यानुसार, करोना व्हायरसच्या विम्याचे कवच (विमा पॉलिसी) सर्वात जास्त लोकांनी सर्च केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हॉरर चित्रपट आणि सर्वश्रेष्ठ तेलुगु चित्रपट २०२० खूप सर्च करण्यात आले आहेत. यावरून लोक मनोरंजनासाठी अधिक वेळ देत असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन ग्रॉसरी डिलिव्हरी आणि रेशन दुकान सुद्धा खूप सर्च करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी यात वाढ झाल्याचे दिसत आहे. इम्यूनिटीमध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. व्हिटामिन सी मध्ये १५० टक्के, अधिक सर्चिंग करण्यात आले आहे. करोना विमामध्ये १२३० टक्के वाढ झाली आहे.

वाचाः

भारतात सुरु असल्याने शाळा कॉलेज बंद आहेत. त्यामुळे लोकांनी ऑनलाइन क्लासेस खूप सर्च केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३०० टक्के वाढ झाली आहे. हाऊ टू चेंज यूपीआय पीन २०० टक्के सर्च करण्यात येत आहे. तसेच वीज बिल कसे भरायचे? आणि वर्क फ्रॉम होम गेल्यावर्षीच्या तुलनेत १५० टक्के अधिक सर्च करण्यात आले आहे. छोले करण्याची रेसिपीत १४८ टक्के वाढ झाली आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here