नवी दिल्लीः रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन प्लान आणला आहे. रिलायन्स जिओने ’ लाँच केला आहे. देशात करोना व्हायरस वाढत असल्याने देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. देशात आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे. त्यामुळे देशातील अनेक कंपन्यांची कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे अनेकांना जास्तीच्या डेटाची गरज लागत आहे. त्यामुळे जिओने पुन्हा एकदा नवीन वर्क फ्रॉम होम प्लान लाँच केला आहे.

वाचाः

जिओचा वार्षिक प्लान
सर्वात आधी जिओच्या वार्षिक प्लानवर चर्चा करुयात. जिओच्या या प्लानमद्ये वर्षभर ग्राहकांना २ जीबी डेटा दरदिवस मिळणार आहे. या प्लानची वैधथा ३६५ दिवस इतकी आहे. ग्राहकांना या प्लानसाठी २३९९ रुपये मोजावे लागणार आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जिओच्या ग्राहकांना अॅन ऑन पॅक सध्याच्या रिचार्ज प्लानला रिचार्ज करून अतिरिक्त डेटा मिळवता येऊ शकतो. दर दिवस या प्रमाणे ग्राहकांना केवळ ६.५७ रुपये दरदिवशीच्या २ जीबी डेटासाठी खर्च करावे लागणार आहे.

वाचाः

जिओचा २३९९ रुपयांचा वार्षिक प्लान हा प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत ३३ टक्के जास्त फायदा देणारा प्लान आहे. जास्त डेटाचा वापर करणाऱ्यांसाठी हा एक व्हॅल्यू फॉर मनी प्लान आहे. घरातून कार करणाऱ्या लोकांसाठी हा प्लान फायदेशीर आहे. कारण केवळ या प्लानचा खर्च २०० रुपये महिना येतो. कंपनीकडे २१२१ रुपयांचा एक प्लान आहे. ज्यात १.५ जीबी डेटा दरदिवस मिळतो. या प्लानची वैधता ३३६ दिवसाची आहे.

नवीन डेटा अॅड-ऑन पॅकचे वैशिष्ट्ये
जिओचा नवीन डेटा अॅड ऑन पॅकची किंमत १५१ रुपयांपासून सुरू होते. १५१ रुपयांच्या या पॅकमध्ये ३० जीबी डेटा, २०१ रुपयांच्या अॅड ऑन डेटा पॅकमध्ये ४० जीबी डेटा आणि २५१ रुपयांच्या प्लानमध्ये ५० जीबी डेटा मिळतो.

वाचाः

जिओचा नव्या डेली डेटा पॅकमध्ये कोणतीही मर्यादा नाही जिओच्या या प्लानला महिन्यात कधीही रिचार्ज करता येऊ शकते. जर तुमचा दररोज मिळणारा हाय स्पीड डेटा संपला तर तुम्ही जिओचा हा प्लान घेऊ शकता. कंपीनीने याआधी अॅड-ऑन प्लानमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here