नवी दिल्लीः कंपनीने भारतात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये केवळ कॅमेराच नव्हे तर ३डी कर्व्ड डिस्प्ले आणि लेटेस्ट क्वॉलकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन पॉवरफुल स्मार्टफोनपैकी एक आहे. या स्मार्टफोनला शाओमीने ऑनलाइन कार्यक्रमात लाँच केले आहे. या फोनसोबत शाओमीने एक वायरलेस चार्जर सुद्धा लाँच केला आहे.

वाचाः

भारतात Mi 10 5G दोन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्मार्टफोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनला प्री ऑर्डर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २५०० रुपयांचा वायरलेस चार्जर फ्री मिळणार आहे. तसेच या फोनवर ईएमआय आणि बँक ऑफर्स सुद्धा दिले आहेत.

वाचाः

Mi 10 5G ची वैशिष्ट्ये
कंपनीने या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर आधारीत एमआयईयूआय ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कंपनीने या फोमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप (चार कॅमेरे) दिला आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २-२ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्युअल मोड ५जी, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखी फीचर्स दिली आहेत. या फोनमध्ये ४७८० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यात ३० वॅट वायर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here