नवी दिल्लीः फेसबुकने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, नवीन मेसेंजर रुम्स लवकरच युजर्संना व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. त्यानंतर कंपनीने अँड्रॉयड अॅपच्या बीटा व्हर्जनवर फीचर टेस्टिंग सुरू केली होती. स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपवर येण्याआधी मेसेंजर रुम फॉर व्हॉट्सअॅपला वेब वर रोलआऊट केले जाणार आहे. लवकरच हे फीचर व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

वाचाः

मेसेंजर रुम्स नवीन ग्रुप व्हिडिओ चॅट फीचर आहे. कंपनी फेसबुकने मेसेंजरमध्ये हे फीचर आणले आहे. याच्या मदतीने अॅप्स स्विच करण्यात आलेल्या युजर्संना व्हॉट्सअॅप, पोर्टल किंवा इन्स्टाग्राम वरून व्हिडिओ चॅटिंग रुम्सचा वापर करता येवू शकणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये येणारे अपडेट्स आणि नवीन फीचर्सला ट्रॅक करणारे WABetaInfo कडून मेसेंजर रुम्स फीचर लवकरच व्हॉट्सअॅप युजर्संसाठी उपलब्ध करून देऊ असे म्हटले आहे.

वाचाः

रुममध्ये व्हिडिओ कॉलिंग
ब्लॉग साइटनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर मेसेंजर रुम्सचा शॉर्टकट अॅड करण्यावर काम करीत आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन २.२०१९.६ मध्ये मिळणार आहे. याच्या मदतीने युजर्संना कोणत्याही मेसेंजरवरून ज्वॉईन करता येवू शकणार आहे. व्हॉट्सअॅप वेब युजर्संना आपल्या लॅपटॉप किंवा पर्सनल कम्प्यूटरवर फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत व्हिडिओ कॉलिंग रुम बनवून चॅटिंग करता येऊ शकणार आहे. यावरून एकाचवेळी ५० युजर्संना व्हिडिओ कॉलिंग करता येवू शकणार आहे.

वाचाः

हे फीचर सध्या सर्व युजर्संना रोलआऊट करण्यात आले नाही. फ्यूचर अपडेट्स मध्ये उर्वरित युजर्संना ते मिळू शकते. मेन अॅपच्या तुलनेत हा एक वेगळे फीचर आहे. याचा व्हॉट्सअॅपमध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. युजर्सला डॉक्युमेंट्री आणि गॅलरी पर्याय सोबत एक नवीन डिझाइनचा आयकोन मेसेंजर रुम्स दिसणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here