Reasons to update OS: तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर ऑपरेटिंग सिस्टम अथवा OS हे शब्द नक्कीच ऐकले असतील. अनेकदा स्मार्टफोनमध्ये OS Update चा मेसेज येत असतो. काही लोक या अपडेटला खूपच गंभीरतेने घेतात व फोनला त्वरित अपडेट करतात. परंतु, अनेक यूजर्स असेही आहेत जे या अपडेटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अनेकजण जुन्याच ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जनवर फोनचा वापर करतात. OS Update साठी जास्त डेटाची गरज असते. त्यामुळे मोबाइल कनेक्टिव्हिटीवर ओएस अपडेट करणे शक्य नसल्याने अनेकजण हे अपडेट टाळताना दिसतात. मात्र, जुने ओएस व्हर्जन वापरल्यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते. फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट न केल्यास तुम्हाला नवीन फीचर्स वापरता येत नाहीत. याशिवाय, फोनचा परफॉर्मेंस देखील खराब होतो. तुम्ही देखील फोनमधील ओएस व्हर्जन अपडेट केले नसल्यास त्वरित करा. OS Update च्या अशाच ५ फायद्यांविषयी जाणून घेऊया.

​सिक्योरिटी अपडेट

नवीन फोन खरेदी केल्यावर तुम्हाला त्यामध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम (OS) व्हर्जन दिले जाते. लेटेस्ट व्हर्जनमुळे तुम्हाला फोनमध्ये नवनवीन फीचर्स वापरता येतात. सोबतच, अनेक कंपन्या पुढील २ ते ३ वर्षासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्योरिटी अपडेट देखील जारी करत असतात. या अपडेटमुळे यूजर्सला जुन्या फोनमध्येच नवीन फीचर्सचा लाभ घेता येतो. याशिवाय, सिक्योरिटीशी संबंधित समस्या देखील दूर होतात. अपडेटमुळे फोनची सिक्योरिटी अधिक मजबूत होते.

वाचाः आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करा iPhone 13, पाहा डिस्काउंट

​लेटेस्ट फीचर

तुम्ही जर जुना अँड्राइड फोन आणि नवीन अँड्राइड फोन पाहिल्यास तुम्हाला दोन्हीमध्ये मोठा फरक पाहायला मिळेल. दोन्ही फोन्समध्ये फीचर्सच्याबाबतीत खूपच फरक असतो. तुम्हाला जर जुन्या फोनमध्ये लेटेस्ट फीचरचा फायदा घ्यायचा असल्यास डिव्हाइसमधील ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करणे गरजेचे आहे. तुम्ही जुने व नवीन Whatsapp व्हर्जन पाहिल्यास यामध्ये देखील मोठे अंतर दिसेल. नवीन Whatsapp व्हर्जनमध्ये अनेक वेगळे फीचर पाहायला मिळतात. हे सर्व फीचर सॉफ्टवेअर अपडेटमुळे वापरता येतात.

​फास्ट ऑपरेटिंग

अनेकदा जुना फोन वापरताना काही अ‍ॅप्स लवकर ओपन होत नाही. तसेच, फोनवर मल्टीटास्किंग करताना देखील बराच वेळ जातो. अशावेळी फोनमधील ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जनला अपडेट करणे गरजेचे आहे. कंपनी ऑपरेटिंग सिस्टम अपडेटसोबत सॉफ्टवेअरला फास्ट करण्याचा देखील प्रयत्न करतात. अपडेटमध्ये सॉफ्टवेअरला नवीन हार्डवेयर आणि ऑपरेटिंग सिस्टमसोबत कंपॅटिबल करण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून, भविष्यात सिस्टमच्या हार्डवेयरमध्ये काही बदल झाल्यास सॉफ्टवेयर व्यवस्थित काम करू शकेल.

वाचाः अलर्ट! Google Play Store ने हटवले ५० हून जास्त धोकादायक अॅप्स, पाहा संपूर्ण लिस्ट

​त्रुटी दूर करणे

अनेकदा डिव्हाइसमध्ये वेगवेगळ्या त्रुटी पाहायला मिळतात. अशा त्रुटी कंपन्या नवीन सिक्योरिटी अपडेट जारी करून दूर करत असतात. बऱ्याचवेळा फोनमध्ये काही अ‍ॅप्स काम करत नाहीत. तर काही अ‍ॅप्स वारंवार क्रॅश होत असतात. अशावेळी कंपन्या नवीन अपडेट जारी करत ही त्रुटी दूर करतात. काहीवेळेस नवीन फोन लाँच झाल्यानंतर देखील त्यात त्रुटी आढळतात. अशावेळी कंपन्या नवीन अपडेट जारी करून या त्रुटी दूर करतात. सोबतच, फंक्शनालिटी देखील अधिक चांगली होते.

​वापर करण्यास सोपे

तुम्हाला जर फोनला व्हायरस, मॅलवेयरपासून दूर ठेवायचे असेल व नवीन फीचर्स वापरायचे असल्यास लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करणे गरजेचे आहे. सॉफ्टवेअर अपडेटद्वारे कंपन्या यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्याचा प्रयत्न करत असतात. अपडेटमुळे, यूजर्सला फोन वापरताना चांगला अनुभव मिळतो, नवीन फीचर्स वापरता येतात. त्यामुळे कंपन्या वेळोवेळी अपडेट जारी करत असतात. सध्या अनेक फोनमध्ये अँड्राइड १२ पाहायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसात अँड्राइड १३ देखील रोल आउट केले जाईल.

वाचाः सिम सुरू ठेवण्यासाठी ‘हा’ आहे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान, अवघ्या १९ रुपयात महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहणार मोबाइल नंबर

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here