नवी दिल्लीः जगभरातील करोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाची (टेक्नोलॉजी) मोठी मदत भारताला होत आहे, असे आज यांनी म्हटले आहे. ‘राष्ट्रीय दिवस’ () निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करीत १९९८ मध्ये झालेल्या पोखरण येथे करण्यात आलेल्या अण्विक चाचणीच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी यांनी काही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अलट बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

वाचाः

१९९८ मध्ये आजच्याच दिवशी आपल्या देशातील वैज्ञानिकांनी एक मोठी कामगिरी पार पाडली होती आणि तो भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण होता. दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जे तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना आम्ही सॅल्यूट करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच जगाला करोनापासून मुक्ती मिळवण्यात मदत मिळतेय, असे ते यावेळी म्हणाले. १९९८ मध्ये पोखरणमध्ये करण्यात आलेल्या अण्विक चाचणीवरून मजबूत राजकीय नेतृत्व हे किती आवश्यक होते, असे मोदी यांनी म्हटले.

आज करोनापासून जगाला मुक्त करण्याच्या प्रयत्नात निरनिराळ्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. करोना व्हायरसचा पराभव करण्याचा मार्ग शोधून काढणाचे प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था आणि योद्ध्यांना मी नमन करतो. मला आशा आहे की आपण निरोगी राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here