Smartphone Offers : अ‍ॅमेझॉन इंडियाने नवीन स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर ऑफर देण्यासाठी ‘मोबाइल सेव्हिंग डेज’ची घोषणा केली आहे. मोबाईल सेव्हिंग डेज सेलमध्ये, ग्राहकांना OnePlus, Xiaomi, Samsung, iQ, Tecno, Oppo, Realme आणि Vivo च्या स्मार्टफोन्सवर ४० टक्के सूट मिळू शकते. Amazon वर हा सेल २९ जुलै 2022 पर्यंत चालेल. Amazon च्या या सेलमध्ये Samsung 13 Series, Redmi K50i 5G, Tecno Spark 9, Tecno Camon 19 Neo आणि iQOO Neo 6 सारखे स्मार्टफोन डिस्काउंट ऑफरमध्ये खरेदी करता येतील. क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर १० टक्के इन्स्टंट सूट ( ७५० रुपयांपर्यंत) आणि EMI व्यवहारांद्वारे केलेल्या खरेदीवर १००० रुपयांपर्यंत सूट असेल. याशिवाय, HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून खरेदीसाठी ६ महिन्यांची विनामूल्य स्क्रीन बदलण्याची आणि ३ महिन्यांची विना-किंमत EMI ऑफर देखील आहे.

Xiaomi Smartphones

xiaomi-smartphones

Xiaomi स्मार्टफोन्स: Xiaomi स्मार्टफोन्सवर सेलमध्ये ४० टक्क्यांपर्यंत सूटसह मिळू शकतात . Redmi 9 Series ६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून दिली जाईल. Redmi Note 10 सीरीज Redmi Note 10T 5G, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi 10S स्मार्टफोन्स १०,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून दिले जातील. Xiaomi 11 Lite २३,९९९ रुपयांना आणि Xiaomi 11T Pro ३५,९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. त्याच वेळी, Xiaomi 12 Pro ५६,९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या सर्व स्मार्टफोन्सवर अतिरिक्त बँक सवलत आणि ६००० रुपयांपर्यंतचे कूपन डिस्काउंट देखील आहेत.

वाचा: आता थिएटरची मजा घरीच ! अवघ्या ६५०० रुपयांत मिळतोय ब्रँडेड Smart TV, पाहा ऑफर्स

Samsung Smartphones

samsung-smartphones

Samsung स्मार्टफोन: Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनवर ५३ टक्के सूट मिळू शकते. सेलमध्ये, Galaxy M-Series फोन ३० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह उपलब्ध असतील. Samsung Galaxy M53 5G आणि Galaxy M33 5G वर ९,००० रुपयांपर्यंत सूट आणि Galaxy M33 5G वर २००० रुपयांपर्यंत सूट.मिळू शकते. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेराचा समावेश आहे.

वाचा : भारतात 5G Auction आज, कॉलिंग आणि इंटरनेट वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार, जबरदस्त स्पीडसह मिळतील हे फायदे

Apple iPhone

apple-iphone

Apple iPhones: ऍमेझॉन मोबाईल सेव्हिंग डेजमध्ये iPhones १०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max वर सर्वोत्तम ऑफर उपलब्ध आहेत.

Tecno स्मार्टफोन्स: Tecno स्मार्टफोन्स मोबाईल सेव्हिंग डेज सेलमध्ये ६,५९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळू शकतात. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन ६,५९९ रुपयांना विक्रीसाठी खरेदी केला जाऊ शकतो. ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यात ६.५२ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी (७२० x १५६० पिक्सल) डिस्प्ले आहे.

वाचा : Smartphone Apps: रोजची कामं मॅनेज करण्यासाठी बेस्ट आहेत ‘हे’ अॅप्स, तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहेत की नाही करा चेक

OnePlus Smartphones

oneplus-smartphones

OnePlsu 9 Series मोबाईल सेव्हिंग डेज सेलमध्ये ३७,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत मिळू शकते. plus 9 Pro वर ५००० रुपयांपर्यंतची झटपट बँक सूट देखील आहे. त्याच वेळी, OnePlus 10R 5G आणि OnePlus 10 Pro 5G वर नो-कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. फोनवर ७,०००रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट आहे. तर, नवीन OnePlus 10R 5G ३४,९९९ रुपयांच्या विक्रीमध्ये सूचीबद्ध आहे. मर्यादित कालावधीसाठी फोनवर ४००० रुपयांची अतिरिक्त सूट आहे. दुसरीकडे, OnePlus Nord CE 2 Lite 5G ला विक्रीमध्ये Amazon वरून खरेदी केल्यास 500 रुपयांची कूपन सूट मिळेल.

वाचा: Top smartphones: मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर ही लिस्ट एकदा पाहाच

iQOO Smartphones

iqoo-smartphones

सेलमध्ये, iQOO स्मार्टफोन्सवर Amazon ९,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. नवीन iQOO Neo 6 5G स्मार्टफोन २९,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर ३,००० इंस्टंट बॅक डिस्काउंट मिळेल. त्याच वेळी, iQOO Z6 Pro स्मार्टफोन २३,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ६४ -मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८- मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल शूटर आणि २- मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी १६ -मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच, iQOO Z6 5G १४,९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.

वाचा : Top smartphones: मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर ही लिस्ट एकदा पाहाच

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here