नवी दिल्लीः ऑनरचा नवीन स्मार्टफोन 9X Pro आज भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन Kirin 810 प्रोसेसर, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी यासारखे फीचर या मोबाइलमध्ये असणार आहेत. या फोनला ग्लोबल बाजारात ऑनर व्ह्यू ३० प्रो फोनसोबत फेब्रुवारी महिन्यात लाँच केले होते. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात गुगल प्ले स्टोर ऐवजी हुवेईची अॅप गॅलरी देण्यात आली आहे.

वाचाः

स्मार्टफोनच्या लाँचिंग संदर्भात माहिती कंपनीने एक ट्विट करून दिली होती. आम्हाला ही घोषणा करताना अत्यानंद होत आहे की, प्री इन्स्टॉल #AppGallery आणि 7nm Kirin 810 चिपसेट सोबत ऑनरचा पहिला स्मार्टफोन Honor 9X Pro १२ मे रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे.

भारतात या स्मार्टफोनची किंमत १५ ते २० हजार रुपये या दरम्यान असू शकते. ग्लोबल बाजारात या फोनची किंमत २४९ यूरो म्हणजेच २० हजार ४०० रुपये आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि पर्पल या दोन रंगात उपलब्ध असणार आहे.

वाचाः

Honor 9X Pro ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल मिळू शकतो. फोनमध्ये 7nm Kirin 810 चिपसेट, ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाणार आहे. तसेच या फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here