Amazon India ने लेटेस्ट स्मार्टफोन आणि एक्सेसरीजवर ऑफर देण्यासाठी ‘Mobile Savings Days’ ची घोषणा केली आहे. मोबाइल सेविंग डेज सेल मध्ये ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. अमेझॉनवर हा सेल २९ जुलै २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये Samsung 13 Series, Redmi K50i 5G, Tecno Spark 9, Tecno Camon 19 Neo आणि iQOO Neo 6 सारख्या स्मार्टफोन्सला डिस्काउंट ऑफर मध्ये खरेदी करू शकता. सेलमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट (७५० रुपयेपर्यंत) आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. याशिवाय, एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर ६ महिन्याची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि ३ महिन्यासाठी नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जाते.

​Mobile Saving Days सेलमध्ये या फोन्सवर डिस्काउंट

mobile-saving-days-

Apple iPhones

आयफोनला अमेझॉन मोबाइल सेविंग डेज सेलमध्ये १० हजार रुपयांपर्यंत सूट वर खरेदी करू शकता. आयफोन १३, आयफोन १३ प्रो, आयफोन प्रो मॅक्सवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे.

Tecno smartphones

Tecno च्या स्मार्टफोन्सला मोबाइल सेविंग डेज सेलमध्ये ६ हजार ५९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोनला amazon mobile saving daysया सेलमध्ये ६,५९९ रुपयाच्या किंमतीत खरेदीची संधी आहे.

​Xiaomi smartphones

xiaomi-smartphones

शाओमीच्या स्मार्टफोन्सला या सेलमध्ये ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत खेरदी करू शकता. रेडमी ९ सीरीजला ६ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. तर बेस्ट सेलिंग रेडमी नोट १० सीरीजच्या रेडमी नोट १० टी ५जी, रेडमी नोट १० प्रो, रेडमी नोट १० प्रो मॅक्स आणि रेडमी १० एस स्मार्टफोन्सला १० हजार ९९९ रुपये सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध केले आहे. शाओमी ११ लाइट ला २३ हजार ९९९ रुपये आणि शाओमी ११ टी प्रोला ३५ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. तर शाओमी १२ प्रोला ५६ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व स्मार्टफोन्सवर ६ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बँक डिस्काउंट आणि कूपन डिस्काउंट सुद्धा मिळत आहे.

वाचाः Samsung चा प्रीमियम ५जी स्मार्टफोन मिळतोय १८ हजार रुपये स्वस्त, ऑफर एकदा पाहाच

​Samsung smartphones

samsung-smartphones

सॅमसंग गॅलेक्सी एस २० एफई ५जी स्मार्टफोनला ५३ टक्क्यांपर्यंतच्या सूट सोबत खरेदी करू शकता. या सेलमध्ये गॅलेक्सी एम सीरीजच्या फोन्सवर ३० टक्क्यांपर्यंत सूट सोबत खरेदी करता येवू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एम ५३ ५जी आणि गॅलेक्सी एम ३३ ५जीवर ९ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते.

Tecno smartphones

टेक्नोच्या स्मार्टफोन्सला मोबाइल सेविंग डेज सेलमध्ये ६ हजार ५९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. टेक्नो पॉप 5 LTE स्मार्टफोनला या सेलमध्ये ६ हजार ५९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः Vivo T1X च्या पहिल्या सेलमध्ये मिळेल १४,२५० रुपयांपर्यंत ऑफर, दुपारी १२ वाजेपासून सेल सुरू होणार

OnePlus smartphones

oneplus-smartphones

OnePlus 9 Series ला मोबाइल सेविंग डेज सेल मध्ये ३७ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. वनप्लस ९ प्रो वर ५ हजार रुपयांपर्यत इंस्टेंट बँक डिस्काउंट मिळत आहे. तर OnePlus 10R 5G आणि OnePlus 10 PRo 5G व नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. फोनवर ७ हजार रुपयापर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे. तर लेटेस्ट वनप्लस 10R 5G ला सेलमध्ये ३४ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे.

वाचाः याला म्हणतात महाग स्मार्टफोन, फोनच्या किंमतीत मुंबईत येईल 4bhk flat, पाहा किंमत

वनप्लस 10R 5G

-10r-5g

लेटेस्ट वनप्लस 10R 5G ला सेलमध्ये ३४ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. फोनवर लिमिटेड पीरियडसाठी ४ हजार रुपयाची अतिरिक्त सूट मिळत आहे. तर वनप्लस नॉर्ड सीई२ लाइट ५जी ला अमेझॉनवरून सेलमध्ये खरेदी केल्यानंतर ५०० रुपयाचे कूपन डिस्काउंट मिळेल. नुकताच लाँच झालेला वनप्लस नॉर्ट २ टी ५जी वर कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः फक्त ६९९९ रुपयात मिळतोय मोठ्या स्क्रीनचा LED TV, आज शेवटचा दिवस

​iQOO smartphones

iqoo-smartphones

या सेलमध्ये अमेझॉनवरून आयक्यूचा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ९ हजार रुपयांपर्यंत सूटवर खरेदी करू शकता. लेटेस्ट iQOO Neo 6 5G स्मार्टफोनला २९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर ३ हजार रुपयाचा इंस्टेंट बँक डिस्काउंट मिळतो. तर iQOO Z6 Pro स्मार्टफोनला २३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. iQOO Z6 5G ला १४ हजार ९९९ रुपयात खरेदीची संधी आहे. याशिवाय, iQOO 9SE, iQOO 9 5G आणि iQOO 9 Pro 5G स्मार्टफोनला बँक, एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करू शकता.

वाचाः ‘या’ देशात १ जीबी डेटासाठी मोजावे लागतात फक्त ३ रुपये, पाहा भारतात किती येतो खर्च?

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here