नवी दिल्लीः टाटा स्कायने भारतात आपल्या Tata Sky Binge+ च्या सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम एसटीबीची किंमत कमी करून आता ती ३९९९ रुपये केली आहे. सेट टॉप बॉक्सला कंपनीने भारतात ५ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. आता यात २ हजारांची कपात करण्यात आली आहे.

वाचाः

तसेच मल्टी टीव्ही कनेक्शन बिंज प्लस घेणाऱ्या Tata Sky Binge+ च्या ग्राहकांशिवाय ही सूट टाटा स्कायच्या सर्व युजर्संना मिळणार आहे. बिंज प्लस अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा नवीन एसटीबी ३९९९ रुपयांत मिळू शकणार आहे. टाटा स्कायने या सेट टॉप बॉक्सची नवीन किंमत आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तसेच नवीन ग्राहकांना आता केवळ ३९९९ रुपये मोजावे लागतील, असे म्हटले आहे. टाटा स्काय बिंज प्लस अँड्रॉयड टीव्हीवर आधारित सेट टॉप बॉक्स आहे. याला कंपनीने जानेवारीत लाँच केले होते. सेट टॉप बॉक्स गुगल व्हाईस असिस्टेंट आणि गुगल प्ले स्टोरला सपोर्ट करते.

वाचाः

नवीन ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंत टाटा स्काय बिंज फ्री असणार आहे. यात Disney+ Hotsar, SunNXT, Hungama Play, Shemaroo आणि Eros Now यासारखे ओटीटी अॅप्स प्रीमियम कंटेट फ्री मध्ये पाहता येवू शकणार आहे. टाटा स्कायने यात तीन महिन्यांचा अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन सुद्धा फ्री केले आहे. फ्री टाटा स्काय बिंजचे सब्सक्रिप्शन संपल्यानं सब्सक्राबर्संना २४९ रुपयांचा प्रति महिना शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच तीन महिन्यांनंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे अॅक्सेस साठी ग्राहकांना १२९ रुपये महिन्याला द्यावे लागणार आहेत.

वाचाः

सध्या टाटा स्काय युजर्संना जे मल्टी टीव्ही कनेक्शन Tata Sky Binge+ घ्यायचे आहे. किंवा सिंगल कनेक्शनला बिंज प्लसवर अपग्रेड करायचे आहे. त्यांना सुद्धा ३९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. टाटा स्काय बिंज प्लस च्या किंमतीत कपात आल्यानंतर याचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here