नवी दिल्लीः शाओमीच्या (Xiaomi) स्मार्टफोनची भारतात किती क्रेझ आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भारतात आज शाओमीच्या रेडमी नोट ९ प्रो मॅक्सचा () पहिला सेल पार पडला. या फोनला भारतात उदंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही मिनिटात हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी एक ट्विट करून ही माहिती दिली. जैन यांनी ट्विट मध्ये म्हटले की, कंपनीचा स्टॉक अवघ्या काही मिनिटात संपला आहे. आता पुढील आठवड्यात मंगळवारी पुन्हा एकदा या फोनचा सेल करण्यात येणार आहे.

ची किंमत

रेडमीच्या या फोनला ऑरोरा ब्लू, व्हाईट आणि इंटरस्टेलर ब्लॅक कलर या तीन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमीच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये किंमत आहे.

रेडमी नोट ९ प्रो मॅक्स
ची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. शाओमीने आतापर्यंत दिलेला ही सर्वात मोठा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक, इन्फ्रारेड अमिटर सह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फीचर्स दिले आहे. फिंगरप्रिंट सेन्सरचे बटनमध्ये इंटिग्रेट करण्यात आले आहे. या फोनच्या फ्रंटला व बॅकला कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७०० सीरिजसह दिला आहे. तसेच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ मोगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लेन्स दिले आहेत. कॅमेऱ्यात रॉ फोटोग्राफी, नाइट मोड, प्रो कलर, पोट्रेट यासारखे फीचर्स दिले आहेत. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. रेडमी फोनमध्ये आतापर्यंत देण्यात आलेली सर्वात मोठी क्षमता असलेली बॅटरी आहे. २० दिवसापेक्षा अधिक बॅटरी स्टँडबाय टाइम करते. २१० तास म्युझिक, २६ तास व्हिडिओ प्लेबॅक करते, असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनची बॅटरी केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here