वाचाः
सॅमसंगच्या या फोनचा कॅमेरा आयफोनच्या कॅमेऱ्यापेक्षा भारी असल्याचे सिद्ध झाले आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याला रेटिंग देणारी प्रसिद्ध वेबसाइट ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. DxOMarkच्या टॉप १० कॅमेरा स्मार्टफोनच्या यादीत स्मार्टफोनला स्थान मिळाले आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोना ११८ गुणांसह १० वे स्थान मिळाले आहे. तसेच ला ११७ गुण मिळाले असून त्याला ११ वे स्थान मिळाले आहे. या यादीत सर्वात जास्त गुण मिळवून टॉपचे स्थान Huawei P40 Pro या स्मार्टफोनला मिळाले आहे. १२८ गुण मिळवून या फोनने बाजी मारली आहे. फ्लिपकार्टवर या आयफोनच्या टॉप मॉडेलची किंमत १.५ लाख रुपये आहे. तर सॅमसंगच्या फोनची किंमत ७८ हजार रुपये आहे.
Samsung Galaxy S20 Plus ची रेटिंग
सॅमसंगच्या या फोनचा फोटो स्कोर १२७ गुण राहिला. या फोनमध्ये अल्ट्रा वाइड कॅमेरा जबरदस्त आहे. लो-लाइट आणि इनडोर मध्ये हा फार काही करु शकत नाही. व्हिडिओ क्वॉलिटी मध्ये याला १०० गुण मिळाले आहेत. रेटिंग फर्मने या फोनचा टॉप टेन मध्ये समावेश केला आहे. परंतु, या स्मार्टफोनचा १२ मेगापिक्सलला प्रायमरी कॅमेरा आणखी थोडा चांगला करता येऊ शकला असता. सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २० प्लस या स्मार्टफोनला आयफोनच्या महागड्या फोनपेक्षा जास्त गुण मिळाल्याने कंपनीला याचा नक्कीच फायदा मिळणार आहे.
आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप
सॅमसंग गॅलेक्सी एस२० मध्ये क्वॉड कॅमेरा आणि आयफोन ११ प्रो मॅक्स स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. गॅलेक्सी एस२० मध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला आहे. आयफोनमध्ये १२ मेगापिक्सल प्लस १२ मेगापिक्सल प्लस १२ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times