दावा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा एक ६ सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओत राहुल गांधी बोलत आहेत की, जे रेड झोन आहे. ते खरे म्हणजे ग्रीन झोन आहे. जे ग्रीन झोन आहे ते रेड झोन आहे.

संबित पात्राने या व्हिडिओ सोबत एक मजकूर लिहिला आहे की, मागून आलू आणि पुढून सोने आणि आता रेड आहे ते ग्रीन आणि जे ग्रीन आहे ते रेड. हे काय आहे?

ट्विटचे
या ठिकाणी पाहा

भाजप नेते आणि मंत्री प्रताप सारंगी यांनीही राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विट केला.

खरं काय आहे ?

राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ अर्धवट आहे. कोणतेही संदर्भ न देता तो शेअर करण्यात आला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर राहुल गांधी राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवरील रेड झोन – ग्रीन झोन यामधील फरक समजून सांगत आहेत.

कशी केली पडताळणी ?

यूट्यूबवर काँग्रेसच्या अधिकृत चॅनेलवर आम्हाला राहुल गांधी यांचा करोना व्हायरस संदर्भातील पत्रकार परिषद घेतलेला व्हिडिओ मिळाला. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर १८:४५ मिनिटावर न्यूज एजन्सी पीटीआयचे पत्रकार राहुल गांधी यांना विकेंद्रीकरण (Decentralisation) संबंधित एक प्रश्न विचारीत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी बोलत आहेत की, हा आजार स्थानिक स्तरांवर संपवायला हवा.

त्यानंतर राहुल गांधी आपले वक्तव्य अधिक स्पष्ट करताना बोलत आहेत की, उदाहरण द्यायचे झाले तर हे जे झोन बनवण्यात आले आहेत. रेड झोन, ग्रीन…हे राष्ट्रीय स्तरावर बनवण्यात आले आहेत. परंतु, हे झोन राज्य स्तरांवर बनवायला हवेत. आपल्या राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला म्हणत आहेत की, राष्ट्रीय स्तरावर जे रेड झोन आहेत. ते खरे ग्रीन झोन आहेत. आणि जे ग्रीन झोन आहेत. ते खरे रेड झोन आहेत. याची सर्व माहिती राज्य स्तरांवरील नेत्यांकडे आहे. म्हणजेच जे झोन बनवण्यात आले आहेत. ते जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार बनवण्यात आले आहेत.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, राहुल गांधी यांचा व्हिडिओ कोणत्याही संदर्भाविना शेअर केला जात आहे.

निष्कर्ष

संबित पात्रा आणि प्रताप सारंगी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रेड झोन-ग्रीन झोनचा व्हिडिओ शेअर केला आहे तो अर्धवट आणि विना संदर्भाचा आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here