| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 28, 2022, 9:33 AM

Infinix Smart 6 Plus Launch Soon: इनफिनिक्स आपल्या नवीन स्वस्त स्मार्टफोनला उद्या भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या फोनला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून लाँच केले जाईल.

 

Infinix

हायलाइट्स:

 • उद्या लाँच होणार Infinix Smart 6 Plus स्मार्टफोन.
 • फोनची किंमत ११ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
 • लाँचआधी झाला फोनच्या फीचर्सचा खुलासा.
नवी दिल्ली:Infinix Smart 6 Plus Launch Soon: Infinix ला आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखले जाते. कंपनी भारतीय बाजारात अगदी कमी बजेटमध्ये येणारे शानदार हँडसेट्स लाँच करत आहे. आता लवकरच Smart 6 Plus स्मार्टफोनला देखील लाँच करणार असून, डिव्हाइसच्या लाँच तारखेचा खुलासा झाला आहे. इनफिनिक्स ‘ज़िद है बड़ी’ टॅगलाइन अंतर्गत फोनला सादर करत आहे. यावरूनच स्पष्ट होते की, फोन दमदार फीचर्ससह येईल. ई-कॉमर्स साइट Flipkart वर याच्या लाँच तारखेसह फीचर्सची देखील माहिती देण्यात आली आहे. Infinix चा हा फोन भारतीय बाजारात २९ जुलै २०२२ ला लाँच होईल. फ्लिपकार्टवर देखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

वाचा: iPhone 14 च्या लाँचआधी खूपच स्वस्तात मिळतोय iPhone 13, Amazon वरून करा खरेदी

Infinix Smart 6 Plus चे लिस्टेड फीचर्स

 • डिस्प्ले- Infinix Smart 6 Plus स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंच HD+ डिस्प्ले दिला जाईल. हा ड्रॉप नॉच डिस्प्ले असेल.
 • बॅटरी- डिव्हाइसमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.
 • रॅम आणि स्टोरेज- डिव्हाइस ३ जीबी इन-बिल्ट रॅम आणि ३ जीबी व्हर्च्यूअल रॅमसह येईल. सोबतच, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देखील मिळेल.
 • कॅमेरा- कंपनीने फोनच्या कॅमेऱ्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, फोटोवरून लक्षात येते की यात फ्लॅश लाइटसह ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाईल.
 • फिंगरप्रिंट स्कॅनर- फोनच्या समोर आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, याच्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

वाचा: एकच नंबर! अवघ्या ६०० रुपयात तुमचा होईल Realme चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

Infinix Smart 6 Plus चे संभाव्य फीचर्स

 • प्रोसेसर- इनफिनिक्सचा हा फोन MediaTek Helio A२प्रोसेसर सपोर्टसह येईल.
 • अन्य फीचर्स- हा एक ४जी फोन असू शकतो. यात फिंगरप्रिंट सेंसर, ड्यूल सिम सपोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक सारखे फीचर्स मिळतील.
 • किंमत – Infinix Smart 6 Plus स्मार्टफोनची किंमत १०,७९० रुपये असू शकते.

दरम्यान, Infinix Smart 6 Plus च्या काही फीचर्सचा खुलासा कंपनीने केला आहे, तर काही फीचर्स लीक झाले आहेत. त्यामुळे २९ जुलैला फोनच्या लाँचिंगनंतरच अधिकृत किंमत व फीचर्सचा खुलासा होईल.

वाचा: ‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक कमाई करणारे IT CEO, पगार समजल्यावर धक्का बसेल

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here