Best Feature Phones: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. बाजारात दरआठवड्याला अगदी १० हजार रुपयांच्या बजेटपासून ते १ लाख रुपये किंमतीचे स्मार्टफोन लाँच होत असतात. मात्र, असे असले तरीही फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. खासकरून ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात फीचर फोन वापरले जातात. फीचर फोन अगदी खूपच कमी किंमतीत उपलब्ध असल्याने सर्वांना सहज परवडतात. याशिवाय, याचा वापर करणे देखील खूपच सोपे आहे. तुम्ही देखील स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले डिव्हाइस उपलब्ध आहे. अवघ्या २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Motorola a70, Lava KKT34 Power, Samsung Guru 1215, Lava A9 आणि Nokia 110 Dual SIM सारखे फीचर फोन्स खरेदी करू शकता. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Motorola a70

motorola-a70

Motorola a70 फीचर फोन २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. मोटोच्या या फोनमध्ये २.४ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी यात १७५० एमएएचची बॅटरी मिळते. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी अनेक दिवस टिकते. फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये फोनची बॅटरी ६ दिवस टिकते. फीचर फोनमध्ये रियर कॅमेरा देखील दिला आहे. Motorola a70 फीचर फोनची किंमत १,९९९ रुपये आहे.

वाचा – धक्कादायक! गुगलवर हॉटेल सर्च करणे पडले महागात, महिलेच्या खात्यातून उडाले १ लाख रुपये

​Lava KKT34 Power

lava-kkt34-power

Lava KKT34 Power फीचर फोनमध्ये २.४ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी कॅमेरा देखील दिला आहे. यात रियरला १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी २००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. लावाचा हा फीचर फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. यात एफएम रेडिओ, व्हिडिओ प्लेयर आणि म्यूझिक प्लेयर देखील दिला आहे. फोनचे वजन फक्त ६४ ग्रॅम आहे. या फीचर फोनला १,४७० रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: एकच नंबर! अवघ्या ६०० रुपयात तुमचा होईल Realme चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

​Samsung Guru 1215

samsung-guru-1215

फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Guru 1215 हा एक चांगला पर्याय आहे. Samsung Guru 1215 हा बेस्टसेलर फीचर फोन आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये १.५ इंच टीएफटी स्क्रीन दिली आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ८०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.फोन एमपी३ म्यूझिकला सपोर्ट करतो. फोनचे वजन ६६ ग्रॅम आहे. फोनला इंडिगो ब्लू गोल्डनआणि सिल्वर रंगात खरेदी करू शकता. याची किंमत १,४९९ रुपये आहे.

वाचा: iPhone 14 च्या लाँचआधी खूपच स्वस्तात मिळतोय iPhone 13, Amazon वरून करा खरेदी

​Lava A9

lava-a9

या लिस्टमधील हा लावाचा दुसरा फोन आहे. Lava A9 फोनमध्ये २.८ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. तसेच, १७०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी अनेक दिवस टिकते. यात ड्यूल सिम सपोर्ट दिला असून, फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंगसह १.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनला १,७९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Nokia 110 Dual SIM

nokia-110-dual-sim

Nokia 110 Dual SIM देखील बेस्टसेलर फीचर फोन आहे. नोकियाच्या या फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपी३ प्लेयर, ऑटो रीडआउट आणि बिल्ट-इन टॉर्च सपोर्ट मिळतो. यात १.७७ इंच डिस्प्ले दिला आहे. तसेच, ४ जीबी रॅमसह १४ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. डिव्हाइसच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात रियर कॅमेरा देखील आहे. Nokia 110 Dual SIM ला १,६९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: कन्फर्म! उद्या लाँच होतोय Infinix चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, किंमत कमी फीचर्स जबरदस्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here