नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी () ने आपल्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये , Redmi 8, आणि या तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती शाओमीने दिली आहे. शाओमीने अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा फोनच्या किंमती वाढवल्या आहेत. देशात १ एप्रिलपासून जीएसटीच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर कंपनीने फोनच्या किंमती वाढवल्या होत्या.

वाचाः

नवीन किंमती पाहा
कंपनीने रेडमी नोट ८ च्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. रेडमी ८ ए ड्युअल आणि रेडमी ८ च्या स्मार्टफोनच्या किंमतीत ३०० रुपये वाढ केली आहे. या फोनच्या किंमतीत वाढ करण्यात आल्यानंतर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या रेडमी नोट ८ या स्मार्ट फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये झाली आहे. या फोनची किंमत आधी १० हजार ९९९ रुपये होती. या फोनच्या ६ जीबी रॅम फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. रेडमी ८ए ड्युअलच्या २ जी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार २९९ रुपये झाली आहे. या फोनची किंमत आधी ६ हजार ९९९ रुपये होती. या फोनची ३ जीबी रॅम च्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. तर रेडमी ८ फोनच्या ४ जीबी रॅम पल्स ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार २९९ रुपये झाली आहे. या फोनची किंमत आधी ८ हजार ९९९ रुपये होती.

वाचाः

एप्रिलमध्ये वाढवली होत्या किंमती
१ एप्रिलपासून देशात जीएसटीच्या दरात १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर मोबाइल कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यावेळी शाओमीने आपल्या सर्व मॉडेलची किंमत वाढवली होती. त्यात या तीन स्मार्टफोनचा सुद्धा समावेश होता. रेडमी नोट ८ च्या फोनच्या किंमतीत ५०० रुपये, रेडमी ८ च्या किंमतीत १ हजार रुपये तर रेडमी १ ड्युअलच्या २ जीबी स्मार्टफोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली होती.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here