Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 29, 2022, 9:34 AM
Redmi 10A Sport Launched: रेडमीने ११ हजार रुपयांच्या बजेटमधील आपला नवीन स्मार्टफोन 10A Sport ला लाँच केले आहे. हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. यात अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.

हायलाइट्स:
- Redmi 10A Sport लाँच.
- फोनची किंमत १०,९९९ रुपये.
- फोनमध्ये मिळेल १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा.
वाचा: ५०MP ट्रिपल कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह आला भन्नाट फोन, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी
Redmi 10A Sport ची किंमत
- Redmi 10A Sport ला एकमेव ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. या फोनची भारतात किंमत १०,९९९ रुपये आहे.
- या स्मार्टफोनला चारकोल ब्लॅक, सी ब्लू आणि स्लेट ग्रे रंगात खरेदी करू शकता. फोन Amazon.in आणि Mi.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Redmi 10A Sport चे स्पेसिफिकेशन्स
- Redmi 10A Sport मध्ये ६.५३ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि पीक ब्राइटनेस ४०० नीट्स आहे.
- फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी२५ प्रोसेसरसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता.
- यात फोटोग्रोफासाठी एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा Xiaomi च्या एआय कॅमेरा ५.० सह येतो. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे.
- पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. फोन अँड्राइड आधारित MIUI १२.५ वर काम करतो.
- कनेक्टिव्हिटीसाठी ४G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ वर्जन ५.०, GPS, मायक्रो USB आणि ३.५mm हेडफोन जॅक मिळेल.
- दरम्यान, रेडमीने भारतात काही दिवसांपूर्वीच Redmi K50i स्मार्टफोनला लाँच केले आहे. याची किंमत २०,९९९ रुपये आहे.
वाचा: ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट प्रीपेड प्लान्स, किंमत १५० रुपयांपेक्षा कमी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times