नवी दिल्लीः अॅपल कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात iPhone SE 2020 ची विक्री येत्या २० मे पासून सुरू होणार आहे. या फोनची डिलिव्हरी देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टवर विक्री करण्यात येणार असली तरी अॅपल स्टोरवर सुद्धा या फोनची विक्री सुरू राहणार आहे.

वाचाः

अॅपलने या नवीन iPhone SE 2 मध्ये ४.७ इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. त्याच्यासोबत एचडीआर १० प्लेबॅक आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच यात टच आयडी दिली आहे. iPhone SE 2 मध्ये ए१ बायोनिक प्रोसेसर आहे. यात सिंगल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. जो १२ मेगापिक्सलचा आहे. आणि याचा अपर्चर एफ/१.८ आहे. त्यामुळे युजर्स ४ के व्हिडिओग्राफी करू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

कॅमेऱ्यासोबत एचडीआर आणि पोर्ट्रेट यासारखे फीचर्स मिळणार आहेत. हा फोन वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. यासाठी नवीन आयफोनला आयपी ६७ रेटिंग मिळाली आहे. हा आयफोनम ब्लॅक, व्हाईट आणि रेड या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. कंपनीने यात दमदार बॅटरी दिली आहे. फोनची बॉडी ग्लास आणि एयरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमने बनलेली आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम कार्डचा समोर्ट मिळणार आहे. ज्यात एक सिम ई-सिम असणार आहे. iPhone SE 2 ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज या तीन पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ४२ हजार ५०० रुपये आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here