दावा

पॅलेट गनने जखमी झालेल्या काही लोकांचा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे. यात दावा करण्यात येतोय की, काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सैनिकांच्या गोळीबारात आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत.

कॅप्शनसोबत हा दावा करण्यात येत आहे की, गुरुवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या अभियानाविरोधात आंदोनल करणारे नागरिक पॅलेट गनने जखमी झाले आहेत.

खरं काय आहे ?

हा फोटो जवळपास २ वर्ष जुना आहे. म्हणजेच २०१८ चा आहे. याचा काश्मीर मधील लष्कराने नुकतेच केलेल्या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही.

कशी केली पडताळणी ?

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला काश्मीरी फुटीरतावादी नेते मीरवाईज उमर फारुख यांचे एक ट्विट मिळाले.

६ डिसेंबर, २०१८ रोजी मीरवाईज यांनी हेच फोटो असलेले तीन फोटो ट्विट केले होते. जे आता शेअर केले जात आहेत.

मीरवाईज फारुखने हे फोटो दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील कैमोह गावचे असल्याचे सांगत शेअर केले होते. परंतु, हे फोटो खरं म्हणजे कुठले आहेत व कधीचे आहेत. यासंबंधीचा दावा ‘टाइम्स ‘ करीत नाहीत. पण, हे फोटो जुने आहेत.

निष्कर्ष

२०१८ चे फोटो चुकीच्या दाव्याने म्हणजेच काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरु झालेल्या सैन्य मोहिमेनंतर जखमी झालेले नागरिक असल्याचे सांगून शेअर केले जात आहेत. या फोटोचा काश्मीर मधील लष्कराने नुकतेच केलेल्या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here