दावा

सुदर्शन न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके ने थर्मल स्क्रीनिंगमुळे घाबरलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात लिहिलेय की, हाहाहा थर्मल स्कॅनिंगची मशीन मियांजीला पोलिसांची बंदूक वाटली.

ट्विटचे
पाहा

याच कॅप्शनसोबत एक व्हिडिओ अनेक फेसबुक युजर आणि ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

उदाहरणासाठी या ठिकाणी पाहा

खरं काय आहे ?

व्हिडिओ केनियाच्या एका कॉमेडी शोमधील आहे. या व्यक्तीने याच आठवड्यात हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता.

कशी केली पडताळणी ?

सुरेश चव्हाणके यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याच्या डाव्या बाजुला ‘Bahaliyake Tv’नावाचा लोगो दिसत आहे. या नावाने यूट्यूब सर्च केल्यानंतर आम्हाला रिजल्टमध्ये सर्वात वर हाच व्हिडिओ मिळाला. जो आता या व्हिडिओतील काही भाग शेअर केला जात आहे. सर्च केल्यानंतर आम्हाला ७ मिनिट ३० सेकंदाचा हा कॉमेडी व्हिडिओ यूट्यूबवर मिळाला जो ११ मे रोजी अपलोड करण्यात आला होता.

यूट्यूब चॅनेल ‘Bahaliyake Tv’ च्या अबाउटमधून माहिती झाले की तो केनियाचा आहे. या ठिकाणी मिळालेल्या आयडीवर टाइम्स फॅक्ट चेकने संपर्क केला.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडी करताना दिसत असलेल्या अभिनेत्याचे नाव हुसेन युसूफ आहे. त्यांनी सांगितले की, मी केनियाचा एक अभिनेता, कॉमेडियन, यूट्यूबर आहे. केनियामध्ये करोना व्हायरसमुळे खूप मोठे संकट आले आहे. करोना व्हायरसमुळे लोक प्रचंड घाबरलेले आहेत. लोकांची तपासणी करण्यात येत आहे. लोक तपासणीसाठी घाबरत आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. जे लोक घरात क्वॉरंटाइन झाले आहेत. त्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू यावे यासाठी.

निष्कर्ष

सुरेश चव्हाणके यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे. तो केनियातील एका कॉमेडी शोचा एक छोटासा भाग आहे. हा व्हिडिओ वास्तविक नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here