Best Earbuds Under 1000: तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्याकडे इयरबड्स अथवा नेकबँड इयरफोन्स असणे गरजेचे आहे. गाणी ऐकण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत, याशिवाय प्रवासात असताना इयरफोन्स खूपच उपयोगी येतो. सध्या ग्राहक वायर्ड इयरफोन्सच्या तुलनेत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या इयरबड्सला प्राधान्य देत आहेत. बाजारात खूपच कमी किंमतीत येणारे अनेक चांगले इयरबड्स उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुम्ही सिंगल चार्जमध्ये या बड्सचा अनेक तास वापर करू शकता. बाजारात अवघ्या १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे शानदार इयरबड्स उपलब्ध आहेत. या किंमतीत तुम्ही PTron Basspods P251, Truke Fit 1, Zebronics Zeb-Sound Bomb आणि Croma Truly Wireless Earbuds सारखे शानदार इयरबड्स खरेदी करू शकता. या बड्समध्ये तुम्हाला Active Noise Cancellation सारखे फीचर्स देखील मिळतात. दमदार फीचर्स येणाऱ्या या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​PTron Basspods P251

ptron-basspods-p251

PTron Basspods P251 इयरबड्सला तुम्ही ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हे बड्स ई-कॉमर्स साइट Flipkart वर स्वस्तात उपलब्ध आहेत. बड्सला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IPX४ रेटिंग मिळाले आहे. हे टाइप सी चार्जिंग सपोर्टसह येतात. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केससह ५० तासांचा म्यूझिक प्लेटाइम मिळेल. तर सिंगल चार्जमध्ये १० तासांची बॅटरी लाइफ मिळते. कमी किंमतीत येणारे हे इयरबड्स तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरतील.

वाचा: Samsung Galaxy F23 5G च्या किंमतीत खूपच मोठी कपात, फीचर्स जबरदस्त; पाहा डिटेल्स

​Truke Fit 1

truke-fit-1

Truke Bud Fit 1 ला तुम्ही १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. ट्रूकच्या या इयरबड्समध्ये सिरी आणि Google Voice Assistant चा सपोर्ट मिळतो. तसेच, अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर देखील दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, चार्जिंग केससोबत १२ तासांचा म्यूझिक प्लेटाइम मिळेल. तसेच, एकदा चार्ज केल्यावर हे बड्स ३.५ तासांची बॅटरी लाइफ ऑफर करतात. Truke Bud Fit 1 ची किंमत फक्त ६९९ रुपये आहे.

वाचा: Amazon वर लवकरच सुरू होतोय खास सेल, अवघ्या ६९ रुपये सुरुवाती किंमतीत मिळतील उपयोगी वस्तू

​Zebronics Zeb-Sound Bomb

zebronics-zeb-sound-bomb

Zebronics Zeb-Sound Bomb इयरबड्स ई-कॉमर्स साइट Amazon वर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. या इयरबड्सला तुम्ही फक्त ८९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. Zebronics च्या या डिव्हाइसमध्ये सिरी आणि गुगल असिस्टेंट सारखे वॉइस असिस्टेंट फीचर देखील दिले आहेत. सिंगल चार्जमध्ये बड्स १२ तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. तसेच, हे टाइप-सी चार्जिंग सपोर्टसह येतात. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.०, टच कंट्रोलचा सपोर्ट मिळतो.

​Croma Truly Wireless Earbuds

croma-truly-wireless-earbuds

Croma Truly Wireless Earbuds देखील खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. टाटा कंपनीचा ब्रँड असलेल्या Croma च्या या बड्सची किंमत फक्त ६९९ रुपये आहे. या बड्सला तुम्ही Croma च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. चार्जिंग केससह हे बड्स १५ तासांची बॅटरी लाइफ ऑफर करतात. तर बड्सला सिंगल चार्जमध्ये ३ तास वापरू शकता. तुम्ही जर स्वस्त इयरबड्स शोधत असाल तर हे चांगले पर्याय आहेत.

​Hammer Airflow 2.0

hammer-airflow-2-0

Hammer Airflow 2.0 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds ला तुम्ही फक्त ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे बड्स ई-कॉमर्स साइट Amazon वर खूपच स्वस्तात उपलब्ध आहेत. या बड्समध्ये १० एमएमचे ड्राइव्हर्स दिले असून, जे शानदार साउंड एक्सपीरियन्स प्रदान करतात. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे. तसेच, आयपीएक्स४ रेटिंग मिळाले आहे. यात Passive Noise Canceling फीचर मिळते. सिंगल चार्जमध्ये या बड्सला तुम्ही अनेक तास वापरू शकता.

वाचा: ४जी कनेक्टिव्हिटीसह येणारे ‘हे’ आहेत सर्वात स्वस्त फोन्स, किंमत १,४९९ रुपयांपासून सुरू

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here