नवी दिल्लीः कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर आणत आहे. या फीचरच्या मदतीने खूप साऱ्या लोकांना पाठवता येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ आपल्या फोनमध्ये मेसेज रेकॉर्ड करायचा आहे. व तो मेसेज अनेकांना पाठवायचा आहे. केवळ बीएसएनएल कंपनीकडू ही सर्विस भारतात पहिल्यांदा टेलिकॉम क्षेत्रात दिली जात आहे. याआधी अशी सेवा कोणत्याच टेलिकॉम कंपनीने दिली नाही.

वाचाः

पुढील दोन महिन्यात बीएसएनएल ग्रुप ऑडियो सर्विस घेऊन येण्याची शक्यता आहे. आता पर्यंत कोणीही टेलिकॉम ऑपरेटरने ही सर्विस आपल्या युजर्संना देत नाही किंवा दिली नाही. कंपनीकडून हे एक फीचर मोबाइल अॅपवरून बीएसएनएलच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सर्वात आधी बीएसएनएल युजर्संना आपला मोबाइल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावा लागेल. त्यानंतर व्हॉईस मेसेजचा वापर करता येणार आहे.

वाचाः

असे पाठवा मेसेज

आपला मोबाइल नंबर नोंदणी केल्यानंतर युजर्संला मोबाइल अॅपमध्ये आपला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड आणि अपलोड करावा लागेल. त्यानंतर कंपनी कॉन्टॅक्ट यादीतील ज्यांना पाठवाया आहे. त्यांचा पर्याय दिसेल. त्यानंतर निवड करून सबमिट बटनावर टॅप करा. त्यानंतर हा रेकॉर्ड केलेला ऑडियो मेसेज सर्व तुम्ही निवड केलेल्या सर्वांना डिलिव्हरी होईल. ज्या लोकांना आता तुम्ही आपला ऑडियो मेसेज पाठवला आहे. त्या व्यक्तीच्या फोनवर तुमच्या मेसेजनंतर एक कॉल जाईल. आणि कॉल रिसिव्ह करताच तुम्ही पाठवेलला ऑडिओ मेसेज त्या व्यक्तीला ऐकायला येईल.

वाचाः

कोणतीही मर्यादा नाही
एकासोबत अनेक नंबरवर कॉल जाणे किंवा मेसेज प्ले होणे या प्रोसेसला कॉल पम्पिंग म्हणतात. जर कोणत्याही कारणाने रिसिव्हर कॉल उचलत नसेल तर तुम्ही पाठवलेला ऑडियो कॉल उचलण्यासाठी त्या व्यक्तीला पुन्हा एकदा कॉल जाईल. यात कोणतीही मर्यादा नाही, असे बीएसएनएल कंपनीने सांगितले आहे. युजर्स कितीही लोकांना ऑडिओ मेसेज पाठवू शकणार आहे. यासाठी खूपच कमी कॉलिंग रेट दराने पैसे युजर्संना द्यावे लागणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here