नवी दिल्लीः (OnePlus 8) ५जी स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल आहे. आज दुपारी २ वाजता अॅमेझॉन इंडियावर हा सेल सुरू होणार आहे. वनप्लस कंपनीने गेल्या महिन्यात आपली फ्लॅगशीप सीरिज लाँच केली होती. या सीरिज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यात वनप्लस ८ (OnePlus 8) आणि वनप्लस ८ प्रो (OnePlus 8 Pro)लाँच केले होते. वनप्लस ८ स्मार्टफोन खरेदीवर अनेक ऑफर्स दिले जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

वाचाः

वनप्लस ८ ची किंमत
OnePlus 8 5G च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमधील स्मार्टफोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला ओनेक्स ब्लॅक, ग्लेशियल ग्रीन आणि इंटरस्टेलर ग्लो या तीन रंगात खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे.

या ऑफर्स मिळणार
या स्मार्टफोन खरेदीवर एसबीआय बँक कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना ईएमआय ट्रान्झॅक्शनवर २ हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच अॅमेझॉन पेच्या मदतीने प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना १ हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. १२ महिन्यासाठी नो कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जिओकडून ६००० रुपयांची फायदे दिले जाणार आहेत. तसेच Audible सर्विसवर १२०० रुपये किंमतीचे बेनिफिट्स आणि ६ फ्री ऑडियो बुक्स ग्राहकांना मिळणार आहे.

वाचाः

या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आहे आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्लूड कर्व्ड डिस्प्ले 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सोबत येतो. यात HDR10+ चा सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. फोनमध्येो डिस्प्ले एसजीएस आय-केअर सर्टिफिकेशन दिला आहे. फोन अँड्रॉयड १० बेस्ड ऑक्सिजन ओएससोबत आहे. ५ जी कनेक्टिविटी आणि वायफाय ६ सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात UFS 3.0 स्टोरेज मिळतो. वनप्लस ८ स्मार्टफोनमध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी वार्प चार्ज ३० T टेक्नोलॉजी सोबत येते. हा स्मार्टफोन केवळ २२ मिनिटात शून्य ते ५० टक्के चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here