दावा

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ खूप साऱ्या लोकांनी शेअर केला आहे. ज्यात काही लोक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. स्वागत करीत आहेत. व्हिडिओला या दाव्याने शेअर केले जात आहे की, मुंबईत समाजवादी पार्टीचे नेते अबू असिम आझमी यांच्या स्वागतासाठी ”च्या घोषणा दिल्या जात आहेत.

पोस्टचे
या ठिकाणी पाहा

व्हिडिओ फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत एक हजारांहून अधिक वेळा याच दाव्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

खरं काय आहे?

व्हिडिओत पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात येत नाहीत. खरं म्हणजे, हे लोक ‘साजिद भाई जिंदाबाद’ अशा घोषणा देत आहेत.

कशी केली पडताळणी ?

व्हिडिओला लक्षपूर्वक ऐकायल्यानंतर स्पष्ट ऐकायला जात आहे की, ‘साजिद भाई जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या जात आहेत.

‘टाइम्स ‘ने महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांच्याशी संपर्क केला. अबू आसिम आझमी यांनी सांगतिले की, हा व्हिडिओ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आहे. १४ मे रोजी उत्तर प्रदेशच्या बांदा साठी रेल्वे रवाना होत होती. आमच्या वडाळाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी बोलावले होते. त्या ठिकाणी पोलीसही उपस्थित होते. मोठे अधिकारी उपस्थित होते. दावा करण्यात येत असलेली ही फालतू गोष्ट आहे. अशा घोषणा दिल्याच नाहीत. साजिद आमचा तेथील जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही याप्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन आज गुन्हा दाखल करणार आहोत.

त्यानंतर आम्हाला अबू आझमीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा ट्विट केलेला व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओत स्पष्टपणे ट्रेनच्या डब्यातून तसेच बाहेरचे लोक घोषणाबाजी करीत आहेत की, अबू आसिम जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, मुंबई पोलीस जिंदाबाद. अशा घोषणा दिल्या आहेत. द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी म्हटले की, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना स्वतः अबू आसिम धडा शिकवेल, असेही आझमी म्हणाले.

निष्कर्ष

मुंबईत समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांच्या स्वागतासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. खरं म्हणजे, ‘साजिद भाई जिंदाबाद’ अशा घोषणा देताना लोक दिसत आहेत, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here