नवी दिल्लीः युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपली ६ पैसे कॅशबॅक ऑफरची वैधता ३१ मे पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच लॉकडाऊन ४.० च्या अखेरच्या दिवसांपर्यंत या ऑफरमध्ये वाढ केली आहे. लँडलाईन युजर्ससाठी ही ऑफर गेल्या वर्षी लाँच केली होती. या ऑफर अंतर्गत युजर्संना व्हाईस कॉलच्या बदल्यात ६ पैसे फायदा होतो.

वाचाः

अशी अॅक्टिव करा ऑफर
या ऑफर अंतर्गत युजर्संना ६ पैसे कॅशबॅक मिळत आहे. पाच मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त लँडलाईनवरून कॉल केल्यानंतर युजर्संना ६ पैसे मिळतात. ६ पैसे कॅशबॅक ऑफरला अॅक्टिव करण्यासाठी ‘ACT 6 paisa’ असे लिहून 9478053334 या नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवा. ही कॅशबॅक ऑफर वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द सब्सक्रायबर्सच्या युजर्संसाठी उपलब्ध आहे.

ट्विटर हँडलवरून दिली माहिती
या ऑफरची माहिती युजर्संना कळावी यासाठी बीएसएनएल तामिळनाडूच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली. या ऑफरला बीएसएनएलने गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात लाँच केले होते. कंपनीने ही ऑफर जेव्हा लाँच केली. ज्यावेळी रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करणाऱ्या प्रत्येक कॉलला ६ पैसे देण्याची सुरुवात केली होती.

रिचार्ज रक्कमवर ४ टक्के सूट
बीएसएनएलच्या या कॅशबॅक ऑफरला युजर्संचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच कंपनीने लॉकडाऊनमध्ये युजर्संच्या मदतीसाठी कंपनीने रिचार्ज रक्कमवर ४ टक्के सूट देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. या सूटचा लाभ त्या ग्राहकांना मिळणार आहे. जे बीएसएनएलच्या अकाउंटला रिचार्ज करतील.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here