Phone Charging: गेल्या काही काळात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन दिसतो. फोनच्या इतर फीचर्स प्रमाणे बॅटरी आणि चार्जिंगपद्धत देखील तितकीच महत्वाची असते तुमचा फोन ५० टक्क्यांहून अधिक चार्ज झाला असला तरीही, चार्जर दिसताच लगेच फोन चार्जिंगला ठेवावा असे तुम्हालाही वाटत असेल. यामागील कारण देखील तसेच आहे. आजकाल स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा वापर जास्त आहे आणि फोन कधीही डिस्चार्ज होतो. पण, तुम्हाला माहितेय का? असे करून तुम्ही तुमच्या फोनमध्ये गोंधळ घालत आहात. तुमचा फोन कुठेही चार्जवर ठेवू नका. यामुळे फोनचे बरेच नुकसान होते. अनेक स्मार्टफोन युजर्स त्यांच्या फोन चार्जिंगबाबत इतरही अनेक चुका करतात, ज्यामुळे फोन लवकर खराब होण्याची शक्यता असते.आज आम्ही अशाच काही चुकांबद्दल माहिती देणार आहो. जे स्मार्टफोन युजर्स फोन चार्ज करतांना हमखास करतात.

Local Charger

local-charger

बनावट चार्जर वापरणे : अनेक युजर्स खर्च टाळण्याच्या नादात स्वस्त प्रोडक्टस वापरतात. ब्रँडेड चार्जर महाग आहेत, त्यामुळे लोक स्वस्त अनब्रँडेड चार्जर वापरतात. पण याचा बॅटरीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही. या fake/Local चार्जर्सना वीज पुरवठ्याचे कोणतेही मानक नसल्यामुळे फोनला योग्य प्रमाणात वीज मिळत नाही. यामुळे फोनची Battery Power खराब होते आणि खराब दर्जाचा चार्जर फोन खराब होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या Xiaomi फोन स्फोटातही हेच प्रकरण पाहायला मिळाले.

वाचा: २० तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह One Plus Nord Buds CE भारतात लाँच, किंमत नाही जास्त, फीचर्स जबरदस्त

0 % Charging

0-charging

बॅटरी ० टक्के : आजकाल स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत. किती तरी रोजची महत्वाची कामं स्मार्टफोनच्या मदतीनेच केली जातात. अशात स्मार्टफोन पूर्ण चार्ज व्हावा आणि त्याचे बॅटरी लेव्हल ० पर्यंत जाऊ नये म्हणून लोक सतत फोन चार्ज करत असतात. पण, अनेकदा युजर्स Battery level 0 % पर्यंत जाऊ देतात. तुम्ही अनेकदा तुमच्या फोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करत असाल तर तेही चुकीचे आहे. यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोकाही वाढतो. लिथियम-आयन बॅटरीचे वारंवार डिस्चार्ज कामगिरीवर परिणाम करते.

वाचा : नवीन फोनवर अपग्रेड करण्याआधी पाहा Mid Range स्मार्टफोन्सची ही लिस्ट, फीचर्स प्रिमिअम, किंमत २५,००० पेक्षा कमी

Wireless Charging

wireless-charging

अधिक वायरलेस चार्जिंग वापरणे : सध्या अनेक लेटेस्ट फीचर्स असलेले फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, आजकाल अनेक फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात येतो. पण, कदाचित तुम्हाला माहित नसेल की, फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही जास्त वायरलेस चार्जिंग न वापरण्याचाच कायम सल्ला दिला जातो. वायरलेस चार्जिंग दरम्यान, बॅटरी आणि केस दोन्ही खूप Heat Emit करतात . यामुळेच जास्त वायरलेस चार्जिंग वापरल्याने फोन खराब होऊ शकतो. ओव्हरहाटिंग टाळण्यासाठी, फोनमध्ये पोर्टेबल चार्जिंग वापरल्यास ते चांगले होईल.

वाचा : Smartphone Offers: १२ GB रॅमसह येणारा ‘हा’ शानदार OnePlus स्मार्टफोन स्वस्तात होईल तुमचा, मिळतोय १५ हजारांचा डिस्काउंट

Charging 100 %

charging-100-

बॅटरी १००% चार्ज करणे : अनेक जण स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करतात. ज्यामुळे फोनचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही तुमचा फोन चार्जिंगवर ठेवता. तेव्हा तो १०० % पर्यंत चार्ज करण्याचा प्रयत्न असतो. पण यामुळे बॅटरीची क्षमता कमी होते याबद्दल अनेकांना माहीत नसते . बॅटरी तज्ञांचे म्हणणे आहे की, लिथियम-आयन बॅटरी ८०-३० टक्के चार्ज ठेवली पाहिजे. यामुळे फोनची पॉवर क्षमता सुधारते. म्हणून यापुढे स्मार्टफोन चार्ज करतांना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नुकसान होणार नाही.

वाचा :Smartphone Heating : तुमचा स्मार्टफोन देखील वारंवार गरम होत असेल तर वेळीच द्या लक्ष , अन्यथा होईल मोठे नुकसान

Using Fancy Covers

using-fancy-covers

मोबाईल केससह फोन चार्ज करणे: आजकालचे बहुतेक फोन मेटल बॉडीचे बनलेले असतात. युजर्स सुद्धा स्मार्टफोनला चांगला लूक मिळावा याकरिता त्यावर फॅन्सी कव्हर्स वर ठेवतात. अशा परिस्थितीत, चार्जिंग दरम्यान तुमचा फोन जास्त गरम होण्याची तक्रार निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे फॅन्सी कव्हर असेल, ज्यामध्ये मेटल वर्क असेल तर चार्जिंग करताना ते काढून टाका. इतकेच नाही तर असे अनेक कव्हर्स आहेत ज्यांमुळे चार्जर नीट कनेक्ट होत नाही. जर तुमच्या फोनच्या बाबतीत असे असेल तर फक्त कव्हर काढून टाका.

वाचा: काही दिवसांत घरी येईल Voter ID Card, ‘या’ लिंकवर करा अर्ज, पाहा संपूर्ण प्रोसेस

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here